
पेण : मागील १७ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामाने वारंवार चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव अशा मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली. यावेळी पेण तालुक्यातील खारपाडा ते आमटेम या भागातील पाहणी दौऱ्यात अनेक समस्या आढळून आल्या. काँक्रीटीकरणाच्या रस्त्याला तडे गेल्याने महामार्गाची दुरावस्था झाल्याचे दिसून आले.