Eknath Shinde : मंत्रिपदासाठी शिंदे गटातले दोन आमदार एकमेकांना भिडले; मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौरा रद्द

cm eknath shinde immediately left for Mumbai from Nagpur maharashtra politics Droupadi Murmu visit
cm eknath shinde immediately left for Mumbai from Nagpur maharashtra politics Droupadi Murmu visitesakal
Updated on

मुंबईः रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतल्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच दिवशी ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंवर दबाव आणला होता.

एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांना बोलून पुढच्या आठवड्यात शपथविधी होईल, असं आश्वासन दिलेलं होतं. तर यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून घेऊ, असंही शिंदे म्हणालेले. परंतु शिवसेनेचे आमदार काहीही ऐकायला तयार नसल्याचं दिसून येतंय.

आता दोन आमदार एकमेकांमध्ये भिडल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना गडचिरोली दौरा रद्द करावा लागल्याचं समोर येतंय. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिलं आहे. मंत्रिपद मिळालेला एक आणि मंत्रिपद न मिळालेला एक गट एकमेकांसमोर आले होते. मंगळवारी दोन आमदार एकमेकांना भिडल्याचं सांगण्यात येतंय.

cm eknath shinde immediately left for Mumbai from Nagpur maharashtra politics Droupadi Murmu visit
Kagal Politics : समरजित घाटगे भाजपची साथ सोडणार? मुश्रीफांच्या मंत्रिपदाने नाराज; आज जाहीर करणार भूमिका

एकनाथ शिंदे यांचा ८ जुलै रोजी गडचिरोली दौरा होता. 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचं आयोजन गडचिरोलीमध्ये करण्यात आलेलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा दौरा अचानकपणे रद्द केलाय. उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिंदेंनी हा कार्यक्रम पुढे ढकलला.

cm eknath shinde immediately left for Mumbai from Nagpur maharashtra politics Droupadi Murmu visit
Bus Accident : दरीमध्ये बस कोसळून भीषण अपघात; २७ प्रवासी ठार, मृतांमध्ये १ वर्षाच्या बाळाचा समावेश

दरम्यान, काल अजित पवार गटाने घेतलेल्या मेळाव्यानंतर त्यांच्याकडे संख्याबळ असल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यांच्या नेत्यांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केलं. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि खुद्द अजित पवारांनी काकांवर गंभीर आरोप करीत टीकास्र सोडलं होतं. त्यामुळे आता शरद पवारांनी काढलेल्या राज्यव्यापी दौऱ्यात राजकारण रंगणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.