'माणूस म्हणून विरोध नव्हताच पण...'; पुरंदरेंविषयी जितेंद्र आव्हाड म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'माणूस म्हणून विरोध नव्हताच पण...'; पुरंदरेंविषयी जितेंद्र आव्हाड म्हणाले...
'माणूस म्हणून विरोध नव्हताच पण...'; पुरंदरेंविषयी जितेंद्र आव्हाड म्हणाले...

'माणूस म्हणून विरोध नव्हताच पण...'; पुरंदरेंविषयी जितेंद्र आव्हाड म्हणाले...

मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. राजा शिवछत्रपती आणि जाणता राजा यामुळे मराठी मनामनात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जात त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर अनेकांनी आदरांजली व्यक्त केली आहे. त्यामध्ये राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा समावेश आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचं मोठेपण अधोरेखित केलं आहे. याशिवाय भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील बाबासाहेबांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

गेल्या आठवभरापासून पुरंदरे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. काल रात्रीपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड होण्यास सुरुवात झाली. अखेर आज पहाटे पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. पुरंदरे यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राचं मोठ नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या आहे. बाबासाहेबांना जेव्हा महाराष्ट्र सरकारच्यावतीनं महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यावेळी त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून, वेगवेगळ्या लेखांमधून बाबासाहेब यांच्या लिखाणावर टीका केली होती. आता आव्हाड यांनी बाबासाहेब यांच्या निधनावर एक व्टिट केलं आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

आव्हाड यांचे ते व्टिट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्याला अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आव्हाड आपल्या व्टिटमध्ये म्हणतात की, माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही. काही लिखाणावर आक्षेप होता... आव्हाड यांच्या त्या व्टिटला काहींना टीकात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. राजा शिवछत्रपतींना साहित्य आणि नाटकाच्या माध्यमातून घराघरांत पोहचविणाऱ्या बाबासाहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी, वाचकांनी आणि श्रोत्यांनी शोक व्यक्त केला आहे. बाबासाहेब यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज दुपारी शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

हेही वाचा: विक्रम गोखलेंची 10 धक्कादायक वक्तव्यं...; एकदा वाचाच

loading image
go to top