संतापजनक! अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा वापर | Video Viral

शाळेतील विद्यार्थ्यांना जवळपास दोन ते अडीच तास रस्त्यावर उभं करून ठेवलं आणि ताफा आल्यानंतर सलाम ठोकायला लावला.
Viral Video
Viral VideoSakal
Updated on

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आणि अजित पवार गटातील नवे मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात एक संतापजनक प्रकार घडला असून त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यांच्या ताफ्याच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेने ओळीने उभे करून तर काहींना खाली बसवून ठेवण्यात आले.

जवळपास हा ताफा येण्याच्या आधी दोन ते अडीच तास ही मुले रस्त्यावर उभी होती. तर ताफा आल्यावर विद्यार्थ्यांना सलाम करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Sharad Pawar In Nashik : "पक्ष बेकायदेशीर, मग त्याच पक्षाच्या नावावर तुम्ही मंत्री कसे झाले?"

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनिल पाटील आणि अजित पवार गटाच्या नेत्यांवर टीकेचा सूर उमटला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. फेसबुकवर पुरूषोत्तम आवारे पाटील यांनी फोटो शेअर केला असून आपला रोष व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की...

"मंत्र्यांनो, हे अमानुष धंदे बंद करा...

अमळनेर येथील आमदार अनिल पाटील यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी अमळनेर येथे शाळेच्या मुलांना चक्क महा मार्गावर दोन्हीकडे बसवले गेले,मंत्री येई पर्यंत दोन-अडीच तास ही मुले बसून होती.

मंत्र्यांनी किंवा राजकीय पक्षांनी हे अमानुष धंदे बंद केले पाहिजेत. स्वतःच्या सत्काराचा एवढा कंड असेल तर भाडोत्री लोक आणा, विद्यार्थी फुकटात मिळतात म्हणून असा वापर करू नका, शिस्तीचा आभास निर्माण करणाऱ्या अजित दादांना हे कसे चालते ?

मंत्री अनिल पाटील यांना त्यांनी खडसावले पाहिजे आणि ज्यांनी या मुलांना रस्त्यावर बसवले त्या मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे..."

असं पुरूषोत्तम आवारे पाटील यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतून फुटून एक गट अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज मंडळी होते. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांचा सामावेश आहे. त्याचबरोबर मंत्री अनिल पाटील यांना यावेळी मंत्रीपद मिळाले. त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com