माहेरचे नाव जपण्यात अडचणी; चाकणकर म्हणतात, "आजवर हा मुद्दा आयोगापुढे आलाच नाही"

ओळखपत्रावर सासरचे नाव लावण्याचा आग्रह; यंत्रणेत सकारात्मक बदल गरजेचा
Should women Change their name and Surname After Marriage
Should women Change their name and Surname After Marriage sakal

नागपूर : शिक्षणाचा टक्का जसजसा उंचावत गेला तशा महिला देखील आपल्या हक्कांबाबत जागृत होत गेल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत महिला आज आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करीत आहेत.

असे असले तरी लग्नानंतर माहेरचे नाव किंवा आडनाव कायम ठेवण्यास आजही महिलांना अडचणी येतात. कायदा महिलांच्या बाजूने असूनही अनेक कागदोपत्रांसाठी महिलांना आजही सासरच्या नावाची विचारणा केली जाते. (Should women Change their name and Surname After Marriage read what rupali chakankar said state womens commission )

पुरोगामीत्वाकडे वाटचाल करीत शासनाने सकारात्मक पावले उचलत स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने शासकीय नोकऱ्यांसह अनेक योजना अन्‌ निकषांमध्ये बदल केला. मात्र, शासन ही यंत्रणा असल्याने अद्यापही मुळापासून हा भेदभाव दूर करण्यात शासनाला यश आलेले दिसत नाही.

शिक्षणासह महिला वर्गामध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे आजच्या पिढीतील स्त्री आपले जन्माचे नाव आयुष्यभर कायम ठेवण्यासाठी आग्रह धरते. मात्र, शासनस्तरावर कुठल्या योजनांचा लाभ घेताना म्हणा किंवा आपले अस्तित्व भक्कम करण्यासाठी जेव्हा एखादी महिला पावले पुढे टाकते तेव्हा माहेरच्या नावाला घेऊन कायमच ‘ती’च्या पदरी निराशा येते.

Should women Change their name and Surname After Marriage
Chitra Wagh On Rupali Chakankar: चित्रा वाघ यांच्या पुन्हा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल

कायद्याच्या दृष्टीने महिलांना आपले नाव किंवा ओळख जपण्याचे अधिकार असूनही क्लिष्ट शासकीय यंत्रणेमुळे महिलेला अस्तित्व टिकवताना अडचणी निर्माण होतात. ही परिस्थिती केवळ शासकीय स्तरावरच पाहायला मिळते असे नाही, तर खाजगी कार्यालयांमध्ये महिलांना कर्ज घेतानासुद्धा हाच अनुभव येतो.

त्यामुळे, शासनाने ओळखपत्र मागताना निकषांमध्ये बदल करीत यंत्रणेवरील ही कात टाकून देण्याची वेळ आली आहे.

Should women Change their name and Surname After Marriage
Rupali Chakankar : चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा; धनंजय मुंडेंच्या बायकोची मागणी

नेमके अडते कुठे?

  • आधार किंवा इतर ओळखपत्रांवर पत्ता (माहेरचा) बदलताना

  • लसीकरणासाठी गर्भवती महिलेला अंगणवाडीत नाव नोंदविताना

  • गर्भवती असताना सोनोग्राफी करताना

  • कागदोपत्री बाळाला नाव देताना

  • स्वत:साठी संपत्ती विकत घेताना

  • विवाह नोंदणी करताना

  • कर्ज घेताना

Should women Change their name and Surname After Marriage
Rupali Chakankar : अवैध गर्भपात छापासत्राचे नियोजन

काही शासकीय प्रक्रिया कागदपत्रांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे, अशा कागदपत्रांची आवश्यकता भासते. या तांत्रिक अडचणी आहेत. हा मुद्दा आजवर आयोगापुढे आला नव्हता. या विषयी सविस्तर माहिती घेईल. त्यानंतर, बोलणे योग्य राहील.

-रूपाली चाकणकर,

अध्यक्ष, राज्य महिला आयोग.

‘ती’ने कोणते नाव वापरावे हा पूर्णत: ‘ती’चा अधिकार आहे. यावर कोणी हरकत घेतल्यास त्यांनी नियम सांगावा. त्या महिलेला लिखित स्वरूपामध्ये या हरकती विषयी कळवावे.

-ॲड. स्मिता सरोदे-सिंगलकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com