Shraddha Murder Case : दिल्लीच्या घटनेचा पुण्यात आक्रोश; हिंदुत्ववादी संघटनांनी नोंदवला निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Shraddha Murder Case : दिल्लीच्या घटनेचा पुण्यात आक्रोश; हिंदुत्ववादी संघटनांनी नोंदवला निषेध

Shraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धाच्या हत्येप्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आफताब पूनावाला यानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केली. या घटनेविरोधात देशभरात आक्रोश व्यक्त होतोय. सोशल मीडियावर अनेकजण राग व्यक्त करत आहेत.

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

आज पुण्यात सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने कोथरूड भागात या घटने विरोधात आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. हा प्रकार दिल्लीत घडला असला तरी तो उद्या पुण्यात पण घडू शकतो म्हणून "आता शांत बसायचे नाही" यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र श्रद्धा वॉलकरच्या आरोपी विरोधात काढलेल्या मोर्चात मुस्लिम विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या आहेत.या सभेला विविध हिंदू संघटनांनी भाग घेतला होता.

हेही वाचा: Shraddha Murder Case: लव्ह जिहादवरून राम कदम आक्रमक! श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी...

हेही वाचा: Shraddha Murder Case: 'मेरा अबदुल ऐसा नही' केतकी चितळेची दिल्ली मर्डर प्रकरणावरील पोस्ट चर्चेत

आरोपी आफताबनं केलेल्या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली जात आहे. वसईची श्रद्धा वालकर ही दिल्लीत प्रियकर आफताब पूनावालासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आफताबनं तिची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने मेहरौलीच्या जंगलात विविध ठिकाणी फेकले. तब्बल सहा महिन्यांनंतर हे सत्य समोर आलं.

टॅग्स :pune