Shravan Maas : 19 वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग! यंदा किती असणार श्रावण सोमवार? अधिक मासामुळं संभ्रमावस्था

यंदा श्रावणातच (Shravan Month) अधिक मास आल्याने आठ श्रावण सोमवार आहेत, अशी संभ्रमावस्था सर्वत्र निर्माण झाली आहे.
Shravan Maas
Shravan Maasesakal
Summary

निज महिन्यात येणारे सणच साजरे करण्याची आपल्याकडे परंपरा (Hindu Panchang) आहे. मग तो श्रावण असो, भाद्रपद वा अन्य कोणताही मास असो.

कोल्हापूर : यंदा श्रावणातच (Shravan Month) अधिक मास आल्याने आठ श्रावण सोमवार आहेत, अशी संभ्रमावस्था सर्वत्र निर्माण झाली आहे. मात्र, शुध्द श्रावणातच सर्व व्रतवैकल्ये करायची असून श्रावण सोमवार चारच असल्याचे आज या क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले.

दरम्यान, अठरा जुलैपासून अधिक श्रावण मासाला प्रारंभ होणार असून तो १६ ऑगस्टपर्यंत असेल. सतरा ऑगस्टपासून शुध्द अधिक (Adhik Maas) मासाला प्रारंभ होणार असून पंधरा सप्टेंबरपर्यंत हा मास असेल. या काळात चार श्रावण सोमवारी व्रत करता येणार आहे.

Shravan Maas
Ganesh Chaturthi : यंदा बाप्पाचं आगमन 19 दिवसांनी लांबणार; 'या' कारणामुळं सणात विघ्न, 28 सप्टेंबरला विसर्जन

अधिक व निज ( शुध्द) मासात एकूण आठ सोमवार आहेत. अधिक मासामुळे यंदा श्रावण दोन महिने असेल. पहिला श्रावण मास हा अधिक व त्यानंतर येणारा श्रावण हा निज (शुध्द) मास असेल. दोन्ही महिन्यातील मिळून आठ सोमवार असले तरी शिवभक्तांनी केवळ निज श्रावण मासातील चार सोमवार २१ व २८ ऑगस्ट आणि ४ व ११ सप्टेंबर या दिवशी आहेत.

Shravan Maas
Uday Samant : नेता असावा तर असा! सामंतांच्या रूपात 'देवमाणूस' धावून आला अन् शालिनीला मिळालं नवं आयुष्य

निज महिन्यात येणारे सणच साजरे करण्याची आपल्याकडे परंपरा (Hindu Panchang) आहे. मग तो श्रावण असो, भाद्रपद वा अन्य कोणताही मास असो. श्रावण मासात नागपंचमी, रक्षाबंधन व श्रीकृष्ण जन्माष्टमी हे महत्त्वाचे सण आहेत. हे सण निज श्रावण मासातच म्हणजेच २१ ऑगस्ट, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर या दिवशी साजरे होणार आहेत.

अधिक मासामुळे लोकांमध्ये ही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, शुध्द श्रावणातील चार सोमवारीच श्रावणाचे व्रत करण्याची आपली परंपरा आहे. अधिक श्रावण मासात आपण परंपरेने जे अधिक मासातील विधी करतो ते करावयाचे आहेत.

- अरूण टोपकर, ज्योतिषतज्ञ

Shravan Maas
Jain Muni Case : शरीराचे तुकडे करुन जैन मुनींची निर्घृण हत्या; गृहमंत्री म्हणाले, 'CBI कडं तपास देणार नाही'

तब्बल १९ वर्षांनी हा योग आला आहे. त्यामुळे सलग दोन महिने श्रावण असेल. काही राज्यात दोन्ही महिन्यातील श्रावण सोमवार होतात. मात्र, महाराष्ट्रात ही परंपरा नाही. शुध्द श्रावणातच श्रावणातील सर्व व्रतवैकल्ये सर्वांनी करावीत.

-मुकुंद जोशी, पुरोहित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com