CM उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाटणकर पुन्हा EDच्या रडारवर

श्रीधर पाटणकर यांच्या आणखी काही मालमत्ता सुद्धा ईडीच्या रडावर आहेत.
Shridhar Patankar ED Updates
Shridhar Patankar ED UpdatesTeam eSakal
Updated on

राज्यात गेल्या काही दिवसांपासून, महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि त्यांचे नातेवाईक केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचं दिसतंय. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे आणि उद्योजक श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावरच ईडीने (ED) कारवाई केली असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर श्रीधर पाटणकर यांच्या आणखी काही मालमत्ता असल्याचं समजतंय. त्यामुळे आता पाटणकर आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Shridhar Patankar ED Updates
अँजिओग्राफी करुन मला मारुन टाकण्याचा कट होता; नितेश राणेंचा गंभीर आरोप

ईडीने २२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर कारवाई केली आहे. ईडीने ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. 'नीलांबरी' प्रकल्पातील ११ सदनिका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी लाँडरींगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच मालमत्तेवर ईडीने कारवाई झाली आहे.

Shridhar Patankar ED Updates
अँजिओग्राफी करुन मला मारुन टाकण्याचा कट होता; नितेश राणेंचा गंभीर आरोप

दरम्यान, आता पुन्हा एकदा श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीच्या रडारवर असल्याचं समजतंय. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com