Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर दिसलं हास्य! मविआसोबतच्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटला?

मविआसोबत जागा वाटपाच्या बैठकीला आज प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः हजेरी लावली.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar esakal

नवी दिल्ली : महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या मागणीमुळं हे जागा वाटप रखडल्याचं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर आज हॉटेल फॉर सिझन्समध्ये सुमारे ४ तास बैठक पार पडली. यामध्ये मविआच्या बैठकीत वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली.

या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. बैठकीनंतर आंबेडकरांनी जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आलं. (smile on prakash ambedkar face after meeting with MVA seat allocation was resolved)

Prakash Ambedkar
Shahjahan Sheikh Handover to CBI : संदेशखालीच्या आरोपीला CBIकडं सोपवा; हायकोर्टाचे बंगाल सरकारला कडक शब्दात निर्देश

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

आजच्या बैठकीत काय झालं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर आजच्या बैठकीत काहीही निर्णय झाला नाही, याचं ब्रिफिंग वरुन होईल, असं त्यांनी सांगितलं. पण तुम्ही जागा किती मागितल्या? काय मागणी केली? या प्रश्नावर बोलताना आंबेडकर म्हणाले, "पुढच्या बैठकीत सर्व गोष्टी ठरतील" त्यानंतर आजची बैठक सकारात्मक होती का? या प्रश्नावर "माझ्या चेहऱ्यावरुन तुम्हाला काय दिसतंय?" असा उलटा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. त्याचबरोबर बाजुला असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी "सकारात्मक, सकारात्मक" असं म्हटलं. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आलं. (Marathi Tajya Batmya)

Prakash Ambedkar
MS Dhoni : IPL 2024 पूर्वी धोनी दिसला नव्या भूमिकेत, व्हिडिओ शेअर करून खुलासा

मविआची पुढची बैठक ९ मार्चला

एकूणच प्रकाश आंबेडकरांनी या बैठकीला स्वतः हून हजेरी लावली आणि बैठकीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आल्यानं बैठकीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मविआची पुढची बैठक ९ मार्च रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com