सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल! उबाठा शिवसेनेला भोपळा अन्‌‌ शिवसेनेला ८ जागा; जिल्हा परिषद निवडणूक; ‘या’ पाच तालुक्यात कोठेच विजय नाही, वाचा...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही. पंचायत समित्यांमध्येही ‘उबाठा’ शिवसेना अपयशी ठरली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा तालुक्यांतील आठ जागा जिंकल्या. मात्र, पाच तालुक्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.
solapur zp election result

solapur zp election result

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही. पंचायत समित्यांमध्येही ‘उबाठा’ शिवसेना अपयशी ठरली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा तालुक्यांतील आठ जागा जिंकल्या. मात्र, पाच तालुक्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.

सोलापूर जिल्ह्यात ‘उबाठा’ची धुरा सक्षमपणे सांभाळेल आणि जिल्हाभर त्याची ओळख आहे, असा एकही प्रभावी नेता नसल्याची चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सुरु आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे संपूर्ण लक्ष अक्कलकोट तालुक्यावरच होते. शिवसेनेकडून रिंगणात असलेले म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे हे सलगर गटातून आणि प्रवीण तानवडे हे वागदरी गटातून विजयी झाले. अक्कलकोट तालुक्यातील १२ पैकी चार जागा (शिरवळ, तोळणूर, सलगर, मुगळी गण) शिवसेनेला मिळाल्या.

माळशिरस तालुक्यात निमगाव गटातून शिवसेनेच्या निलावती ठवरे आणि निमगाव व गोरडवाडी गणातूनही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. दक्षिण सोलापुरातील हत्तुर गटातून माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी व शिवसेनेचे युवानेते अमर पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पाटील या शिवसेनेकडून विजयी झाल्या. भंडारकवठे गणात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. मोहोळ तालुक्यातील पेनूर गटातून जिल्हाप्रमुख चरणराज चवरे आणि माढ्यातील बेंबळे गटातून शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांच्या पत्नी सविता कोकाटे या विजयी झाल्या. तर सांगोल्यात शिवसेनेच्या महूद गटातील दादासाहेब लवटे आणि कडलास गटातून शोभाताई खटकाळे यांनी बाजी मारली. शिवसेनेला आठ जागा मिळाल्या, पण अपेक्षित यश मिळाले नाही.

तालुकानिहाय शिवसेनेच्या जागा

  • तालुका विजयी जागा

  • अक्कलकोट ०२

  • सांगोला ०२

  • द.सोलापूर ०१

  • माळशिरस ०१

  • माढा ०१

  • मोहोळ ०१

  • एकूण ०८

‘या’ तालुक्यात शिवसेना अपयशी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला तर एकही जागा मिळाली नाही. पण, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा, पंढरपूर व मंगळवेढा या पाच तालुक्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलादेखील एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेचे सगळेच नेते आपल्याच कुटुंबातील तथा तालुक्यातील उमेदवारांना विजयी करण्यात व्यस्त होते, त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही, असे निकालावरून दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com