सोलापुरी ब्रॅण्डचा जगात डंका! मंगळवेढ्यातील ‘मालदंडी ज्वारी’ मधुमेह रूग्णही खातात; डाळिंब अन् मालदांडी ज्वारीला जगभरात मोठी मागणी का, जाणून घ्या

दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब व मालदांडी ज्वारीचा ब्रॅण्ड तयार झाला आहे. दोन्ही शेतीमालास जीआय मानांकन मिळाले, असून सध्या दोन्ही पिकांना नेदरलॅंड, युरोप व अरब देशात मोठी मागणी आहे.
ज्वारी
ज्वारीsakal

सोलापूर : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब व मालदांडी ज्वारीचा ब्रॅण्ड तयार झाला आहे. दोन्ही शेतीमालास जीआय मानांकन मिळाले, असून सध्या दोन्ही पिकांना नेदरलॅंड, युरोप व अरब देशात मोठी मागणी आहे. त्यातून शेतकऱ्यांना परकीय चलनदेखील मिळू लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यात ज्वारीखालील क्षेत्र साडेचार लाख हेक्टरपर्यंत आहे. उसाचे क्षेत्र व साखर कारखानदारी वाढली, तरीदेखील शेतकऱ्यांची फळबाग लागवडीकडे ओढा जास्त आहे. रब्बीच्या दुष्काळी जिल्ह्यात आता उजनी धरणामुळे व शेतकऱ्यांच्या आधुनिकतेमुळे डाळिंब, केळी, मालदांडी ज्वारी, सीताफळ अशा पिकांखालील क्षेत्र वाढले आहे. डाळिंबाला जीआय मानांकन मिळाले आहे. याची मागणी नेदरलॅंड आणि युरोप येथे जास्त असून आता युरोपच्या बाजारपेठेत सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबाचे सॅम्पल पास झाले आहे.

डिसेंबरअखेर आता डाळिंबाची निर्यात होणार आहे. जिल्ह्यातील करमाळा, माढा, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस अशा तालुक्यांमधील केळी देखील अरब देशात निर्यात होते. वातावरण कोरडे व पाणी भरपूर असल्याने मालाची गुणवत्ता चांगली राहते. त्यामुळे केळीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अरब देशातही दबदबा निर्माण केला आहे. परदेशी अन्नधान्यावर अवलंबून असणाऱ्या देशात आता शेतकऱ्यांच्या आधुनिकतेमुळे परकीय अवलंबित्व कमी झाले आहे. त्यात सोलापूरच्या शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. साखर उत्पादनातही सोलापूर जिल्हा राज्यातील पहिल्या पाचमध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या साखरेलाही परदेशात मोठी मागणी आहे.

भाकरीच्या गुणवत्तेवर तयार झाला ‘मालदंडी’चा ब्रॅण्ड

जिल्ह्यातील मालदांडी ज्वारी ही जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशाबरोबरच देशांतर्गत बाजारपेठेत सोलापूरची मालदांडी ज्वारी प्रसिद्ध आहे. या ज्वारीला जीआय मानांकन मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी जगाची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ना कडक ना नरम भाकरी, हे या ज्वारीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भाकरी केल्यानंतर अनेक तास ती मध्यम स्वरूपाची राहते, कडक होत नाही. त्यामुळे सोलापूरच्या मालदांडी ज्वारीचे ब्रॅण्ड भारतभर प्रकाशझोतात आले आहे.

सांगोल्याच्या डाळिंब ब्रॅण्डचा युरोपात डंका

सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेल्या शेतमालाला परदेशात चांगली मागणी व चांगला दर मिळतो. दीड एकरात २४ ते ३० टनापर्यंत उत्पन्न निघते. जीआय मानांकन मिळाल्याने शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध झाली. सांगोल्याचा डाळिंबाचा ब्रॅण्ड जगभरात प्रसिद्ध आहे.

- राहुल गायकवाड, शेतकरी, कडलास, सांगोला

मंगळवेढ्यातील नैसर्गिक ज्वारीला जगभरात मागणी

मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी नैसर्गिकरित्या सेंद्रिय असून त्याला कोणताही खत न टाकता पावसाच्या पाण्यावर येते. मधुमेह रुग्णही खाऊ शकतात अशी ज्वारी आहे. रासायनिक खतांचा वापर न करता ही ज्वारी उत्तम दर्जाची येते. २०१७ मध्ये या ज्वारीला जीआय मानांकन मिळाले आहे.

- अविनाश गवळी, शेतकरी, मंगळवेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com