'राष्ट्रवादी'च्या नूतन आमदारांना पवारांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

विधिमंडळात प्रभावी कामगिरी करण्यासाठी नूतन आमदारांनी दिवसातील काही वेळ तरी ग्रंथालयात घालवावा, अभ्यास करावा, असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना आज येथे दिला.

मुंबई - विधिमंडळात प्रभावी कामगिरी करण्यासाठी नूतन आमदारांनी दिवसातील काही वेळ तरी ग्रंथालयात घालवावा, अभ्यास करावा, असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना आज येथे दिला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शरद पवार आपल्या आमदारांसमवेत विधानभवनात आले होते. या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज विधानभवनाला भेट दिली. या वेळी नूतन आमदारांनी विधिमंडळाच्या विविध कार्यालयांना भेटी दिल्या तसेच विधिमंडळाच्या ग्रंथालयाला भेट दिली.

नव्या आघाडीसाठी जोरबैठका

ग्रंथालयातील दस्तऐवज आणि विधिमंडळ कामकाजाचे खंड याविषयी विधिमंडळ ग्रंथालयाचे ग्रंथपाल तथा माहिती संशोधन अधिकारी बा. बा. वाघमारे यांनी या आमदारांना माहिती दिली. यानंतर शरद पवार यांनी आज विधानभवनात जाऊन वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. त्या वेळी, फोटोग्राफर लोकांनी आमदारांसह ग्रुप फोटो काढायची विनंती केली. पवार यांनीही फोटो काढण्यासाठी होकार दिला.

छः महीने दिए हैं, बनाओ भाई सरकार!; अमित शहांचे उघड आव्हान

या वेळी पवार यांचे लक्ष कोपऱ्यात उभा असणाऱ्या विधानभवनाच्या सुरक्षारक्षकाकडे गेले. त्यांनी त्या सुरक्षारक्षकाला बोलवून घेतले. विशेष म्हणजे पहिल्या रांगेत उभे करून स्वतःसोबत फोटो काढला. पवारांच्या या कृतीने अनेकांचे लक्ष वेधले, तर त्या सुरक्षारक्षकाला गहिवरून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spend some time in the library all day