
नागपूर : मांस खाणं चूक नाही पण दररोज मांस खाणं हे शरीरासाठी हानिकारक ठरतं. त्यामुळं भारतीय परंपरेत देवाला बळी देऊन प्रसाद स्वरूपात दिलेलं मांस खायला सांगून त्याच्या सेवनावर नियंत्रण आणलं असल्याचं मत श्रुंगेरी महासंस्थान शारदा पिठाचे 72 पीठाधीश शंकराचार्य अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'बनाये जीवन प्राणवाण' या पुस्तकाचं प्रकाशन झालं, या कार्यक्रमात ते उपस्थित होते. हा सोहळा सुरेश भट सभागृहात पार पडला.