SSC Result 2023 : मार्कशिटवर 35 % पण थाट 100%, आईबापसुद्धा करतायत लेकाच्या मार्काचा रुबाब !

अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि त्याबरोबरच त्यांची चर्चा तर झालीच मात्र ठाण्यातील विशाल कराड या विद्यार्थ्याची मात्र एका वेगळ्या कारणाने महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.
SSC Result 2023
SSC Result 2023 esakal

SSC Result 2023 : काल २ जूनला १० बोर्डाचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला. निकालापूर्वीपासून विद्यार्थ्यांसह पालकांनासुद्धा मुलाला किती टक्के मिळतील याची धाकधूक लागून होती. निकाल लागताच कोणाला किती टक्के पडले याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि त्याबरोबरच त्यांची चर्चा तर झालीच मात्र ठाण्यातील विशाल कराड या विद्यार्थ्याची मात्र एका वेगळ्या कारणाने महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

ठाण्यातील विशाल कराड या विद्यार्थ्याला १० वीत सर्व विषयात ३५ टक्के गुण पडले आहेत.विशालचा निकाल मात्र त्यांच्या पालकांसाठी आनंदाचा विषय ठरला आहे.

निकाल बघून त्याचे आई-वडील भलतेच खुश झाले आहेत. गुण कमी का आलेत म्हणून पोरांवर चिडणारे पालक एकीकडे तर 35% गुण मिळवणाऱ्या विशालवर खुश होत त्याला पेठा भरवणारे त्याचे पालक एकीकडे. (Thane)

विशालला व्हायचेय इंजिनियर

विशालला इंजिनियर बनून त्याच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. विशालचे त्याच्या राहत्या परिसरातही जोरदार कौतुक सुरु आहे. सर्व विषयांत ३५ गुण घेत ३५ टक्क्यांची युनिक मार्कशिट त्याने मिळवलीय. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. (SSC)

SSC Result 2023
SSC Result 2023 : कोकणच सरस, मुलींची आघाडी कायम; दहावीत १५१ जणांना १०० टक्के गुण, १०८ जण लातूर विभागातील

10वी नंतर करियर निवडताना हे ५ मुद्दे लक्षात घ्या

१) दहावीनंतर तुम्हाला करियर निवडण्यात अडचण येत असेल तर तुम्ही आधी तुमची बुद्धिमत्ता चाचणी करून घ्या. या चाचणीद्वारे तुम्हाला कुठल्या क्षेत्रात रस आहे ते स्पष्ट होईल.

२) तसेच अभ्यासक्रमाबाबत वरिष्ठांशी चर्चा करून क्षेत्र निवड्याचा निर्णय घ्यावा.

३) तुम्हाला नको असलेल्या क्षेत्रात प्रवेश घेऊ नये. तुमचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते.

४) करियर निवडताना त्याच्याबाबतची सगळी माहिती आधीच काढून ठेवावी.

५) मोठ्या शहरांत उच्च शिक्षणासाठी जायचे असल्यास तुम्ही शासनाच्या मोफत वसतीगृहासाठी आधीच अर्ज करून ठेवावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com