एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना! राज्यात, परराज्यातील प्रवासासाठी कमी केले २०० ते ८०० रुपयांनी सवलतीच्या पासची रक्कम, जाणून घ्या दर...

महाराष्ट्र राज्यात आणि राज्याबाहेरील चार किंवा सात दिवसांचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘आवडेल तिथे प्रवास’ ही योजना सुरू केली आहे. आता योजनेअंतर्गत प्रवासाच्या पासच्या मूल्यात काही दिवसांपूर्वी बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विविध प्रकारच्या पासचे दर २०० ते ८०० रुपयापर्यंत कमी केले आहेत.
solapur
एसटीSakal
Updated on

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात आणि राज्याबाहेरील चार किंवा सात दिवसांचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘आवडेल तिथे प्रवास’ ही योजना सुरू केली आहे. आता योजनेअंतर्गत प्रवासाच्या पासच्या मूल्यात काही दिवसांपूर्वी बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विविध प्रकारच्या पासचे दर २०० ते ८०० रुपयापर्यंत कमी केले आहेत. ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ५० टक्के सवलतीचे दर या पासमध्ये उपलब्ध आहेत.

साध्या एसटी बसमधून सवलतीच्या प्रवासासाठी पूर्वी १८१४ रुपये शुल्क होते. ते आता १३६४ इतके केले असून पूर्वीचे शुल्क ४५० रुपयांनी कमी केले आहे. तसेच १२ मीटर ई-बस शिवाईच्या पासचे दर देखील २८६१ रुपयांवरून २०७२ रुपयांपर्यंत कमी केले आहेत. यामध्ये पूर्वीचे दर ७८९ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

सर्व प्रकारच्या बसच्या पास शुल्काचे दर स्वस्त करण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लहान मुलांकरिता असलेले तिकीट दर देखील पाच वर्षांपेक्षा जास्त वयाची व १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत.

चार दिवसांकरिता पाससाठी

  • प्रौढ प्रवासी जुने दर नवीन दर

  • साधी १८१४ १३६४

  • शिवशाही २५३३ १८१८

  • ई- शिवाई २८६१ २०७२

  • ------------------------------------------------

  • मुले जुने दर नवीन दर

    • साधी ९१० ६८५

    • शिवशाही १२६९ ९११

    • ई- शिवाई १४३३ १०३८

    • -------------------------------------------------------------------------

सात दिवसांकरिता पाससाठी

  • प्रौढांसाठी जुने दर नवीन दर

  • साधी ३१७१ २३८२

  • शिवशाही ४४२९ ३१७५

  • ई- शिवाई ५००३ ३६१९

  • -------------------------------------------------------

  • मुले जुने दर नवीन दर

  • साधी १५८८ ११९४

  • शिवशाही २२१७ १५९०

  • ई- शिवाई २५०४ १८१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com