ST Employee DA: ‘राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ ऐवजी ५३ टक्के एवढा महागाई भत्ता देण्यात येईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. सह्याद्री अतिथिगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, यावेळी शिंदे बोलत होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.