
Mhada Buildings: मुंबईत म्हाडानं विकसित केलेल्या अनेक जुन्या इमारती आहेत. यांपैकी अनेक इमारती या जीर्ण झालेल्या आहेत, त्यामुळं पावसाळ्यात या इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अद्यापही लोक अशा इमारतींमध्ये राहत आहेत. अशा इमारतीतील रहिवाशांसाठी घरभाडं देण्याची योजना म्हाडानं आणली आहे. पावसाळ्यापूर्वीच म्हाडानं हा मोठा निर्णय घेतला आहे.