लालपरीवर लक्ष्मी प्रसन्न: एका दिवसात कोट्यवधींची कमाई, ९० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद 

ST News: या एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी ६० लाखचा महसूल मिळवला मिळवला होता |In this one day, the corporation had earned a revenue of 31 crore 60 lakhs
लालपरीवर लक्ष्मी प्रसन्न: एका दिवसात कोट्यवधींची कमाई, ९० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद 

St News: राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटी वरच अवलंबून आहे. यंदा उन्हाळ्यात  एसटीने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे त्याला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा उन्हाळ्यात एसटी सुसाट धावली ९० टक्के प्रवाशांनी पसंती दिली आहे. २२ एप्रिल रोजी ३१ कोटी ११लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 

उन्हाळ्यानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी पुन्हा एसटीला पसंती दर्शविली आहे. २२ एप्रिलला मिळेलेले ३१ कोटींचे उत्पन्न हे  गेल्या पाच  महिन्यातील उचांकी उत्पन्न आहे. भाऊबिजेच्या दिवशी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व मार्गावर गाड्या धावल्या. या एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी ६० लाखचा महसूल मिळवला मिळवला होता. 

लालपरीवर लक्ष्मी प्रसन्न: एका दिवसात कोट्यवधींची कमाई, ९० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद 
ST News: प्रवाशांचा एसटी प्रवास या निर्णयामुळे सुखकर होणार; वाचा संपूर्ण बातमी

मात्र डिसेंबर महिन्यात लांब पल्ल्याचे भाडे कमी होते  तसेच एसटीने हंगामी भाडेवाढ केली होती  सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आलेली. ती भाडेवाढ डिसेंबरमध्ये रद्द करण्यात आली त्यामुळे पुन्हा एकदा एसटीच्या उत्पन्नात घट झाली होती. पण आता पुन्हा एकदा एसटी चांगले उत्पन्न मिळाले आहे.

  ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ५० टक्के तिकीट सवलतीची महिला सन्मान योजना यामुळे यंदा एसटीला उदंड प्रवासी लाभला आहे. योग्य पद्धतीने केलेले गाड्यांचे नियोजन आणि वर्षभरात आलेल्या नवीन गाड्यांचा ताफा यामुळे बसगाड्या राज्यातील सर्व मागांवर धावल्या. या एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी १० लाखचा महसूल मिळवला. 

लालपरीवर लक्ष्मी प्रसन्न: एका दिवसात कोट्यवधींची कमाई, ९० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद 
ST News: उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लालपरी सज्ज; सोडल्या जाणार अधिकच्या बसेस

--

१५ नोव्हेंबर २०२३ उत्पन्न - ३१ कोटी ६० लाख   

२२ एप्रिल ०२४ उत्पन्न ३१ कोटी ११ लाख 

३१ पैकी ७ विभाग १०० टक्के प्रवासीसंख्या 

यवतमाळ 

 बुलढाणा 

 अकोला 

 जळगाव 

 गडचिरोली 

 लातूर 

 धुळे 

लालपरीवर लक्ष्मी प्रसन्न: एका दिवसात कोट्यवधींची कमाई, ९० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद 
ST Bus Accident : एसटी बस उलटून १४ जण जखमी

असे उत्पन्न वाढले 

एसटी  महामंडळाकडे गाड्या कमी असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. परंतु आहे त्या गाड्यांचे योग्य नियोजन करत उत्पन्न वाढले आहे. त्यासाठी राज्यात सहा प्रादेशिक विभागात पालक अधिकारी नेमण्यात आले असून ते एसटी वाहतुकीचा रोज आढावा घेत आहेत. पालक अधिकारी ही जबादारी खातेप्रमुखांना देण्यात आली आहे. त्यावर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  डॉ माधव कुसेकर हे लक्ष ठेवत आहेत. 

---

एसटीला उन्हाळ्यात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु आवश्यकतेच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी आहे.  

अपेक्षित गाड्या आल्यास  एसटी महामंडळ एका दिवसासाठी नाही तर सातत्याने नफ्यात येईल.  

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस

लालपरीवर लक्ष्मी प्रसन्न: एका दिवसात कोट्यवधींची कमाई, ९० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद 
ST Corporation : 'एसटी'ची स्वच्छतागृहे अचानक तपासणार; CM शिंदेंच्‍या सूचनेनंतर महामंडळाला आली खडबडून जाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com