अल्टीमेटम संपला! एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून होणार कारवाई: अनिल परब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil parab

अल्टीमेटम संपला! एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून होणार कारवाई: अनिल परब

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली मुदत उद्या संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी उद्या कारवाई होणार काय, याबाबतची माहिती दिली आहे. अनिल परब यांनी आपण कर्मचाऱ्यांवरील कारवाईवर ठाम असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आतापर्यंत सातवेळा अल्टीमेटम दिला गेला आहे. मात्र, प्रशासन फक्त अल्टीमेटम देतंय आणि कारवाई करणार नाही, असा त्यांचा समज झालाय. मात्र, आज रात्री अखेरपर्यंत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर उद्या नक्कीच कारवाई होणार आहे. यामध्ये त्यांचं निलंबन असेल, बडतर्फी असेल किंवा सेवासमाप्ती असेल. (Anil Parab)

हेही वाचा: अखेर 736 दिवसांनी महाराष्ट्र मास्कमुक्त; आरोग्य मंत्री राजेश टोपे

पुढे ते म्हणाले की, सध्या पाच हजार बसेस सुरु आहेत. आधी बारा हजार सुरु होत्या. पण आता उपलब्ध कर्मचाऱ्यांसह आम्ही काम सुरु करतो आहे. याशिवाय अकरा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही करतोय. तसेच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाई करणार आहोत. उद्यापासून जे येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असं दिसतंय. जे पाच महिने आले नाहीयेत. ते कोणतंही कारण न देता गैरहजर आहेत, त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत. म्हणून आम्ही ही कारवाई करणार आहोत. (Anil Parab)

हेही वाचा: मुंबईकरांनो! आता लोकल प्रवासासाठी कोरोनाची लससक्ती नाही

27 ऑक्टोबरपासून संपावर आहेत. 33 हजार 135 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 48 हजार 530 कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. ते अजूनही संपाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरुन सेवा सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जे कर्मचारी कामावर हजर होतील, त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाहीये, मात्र, जे हजर होणार नाहीत, त्यांच्यावर ठोस कारवाई होईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. (Anil Parab)

Web Title: St Strike Anil Parab Ultimatum Is Over Action Will Be Taken Against St Employees From Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top