कोल्हापूर - अर्ज छाननीनंतर पाटील-महाडिक गटातील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

विधान परिषदेच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये आज अर्ज छाननी झाली.

अर्ज छाननीनंतर पाटील-महाडिक गटातील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

कोल्हापूर - विधान परिषदेच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये आज अर्ज छाननी झाली. विधान परिषदेचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दोन्हीही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आपल्या उमेदवाराचा जयजयकार केला.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

दरम्यान, वातावरण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ या दोन्ही गटांना दोन वेगवेगळ्या ठिकणी उभे केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही शाब्दिक चकमक झाली नाही. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून राजेश लाटकर, सुनील मोदी, महादेव नरके, आदिल फरास तर माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून माजी खासदार धनंजय महाडिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: कायतरी शिजतोय मोठा डाव...; ST आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा

loading image
go to top