Press Conference Today on 29 Municipal Corporations Polls
Esakal
महाराष्ट्र बातम्या
मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Local Body Elections: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. २९ महानगरपालिकेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होऊ शकते.
Muncipal Corporation Elections: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिलीय. निवडणुकीची घोषणा झाल्यास आजच आचारसंहिता लागणार आहे. राज्यातील २९ महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत.

