

Maharashtra Employees DA Hike state government decision
esakal
State government dearness allowance increase : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे.