

Foreign Education In India
ESakal
मुंबई : देशातील मुंबई, बंगळूर, दिल्ली आदी शहरांत येऊ घातलेल्या परदेशातील विविध नामांकित विद्यापीठांच्या संकुलांमुळे २०४०पर्यंत या विद्यापीठांत देशातील पाच लाख ६० हजारांहून अधिक विद्यार्थी या विद्यापीठांच्या संकुलांत शिक्षण घेऊ शकतील. यामुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच देशाला ११३ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या परकीय चलनाची बचत होईल, असा दावा ‘डेलॉइट इंडिया’ आणि ‘नाईट फ्रँक इंडिया’ यांनी संयुक्तरीत्या प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल युनिव्हर्सिटी आय इंडिया अपॉर्च्युनिटी’ या अहवालात करण्यात आला आहे.