Drugs news : राज्य अमलीपदार्थांच्या विळख्यात !

मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी महत्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात गांजा, कोकेन, हेरार्ईन, चरस, मेफेड्रोन या अमलीपदार्थ विक्रीचे हजारो किलो व कोट्यवधी रूपये किंमतीचे साठे पकडण्यात आले. नशेच्या बाजारात राज्यातील तरूणाई अडकून गेल्याचे वास्तव या घटनांनी समोर आले आहे.
smok
smoksakal

मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी महत्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात गांजा, कोकेन, हेरार्ईन, चरस, मेफेड्रोन या अमलीपदार्थ विक्रीचे हजारो किलो व कोट्यवधी रूपये किंमतीचे साठे पकडण्यात आले. नशेच्या बाजारात राज्यातील तरूणाई अडकून गेल्याचे वास्तव या घटनांनी समोर आले आहे. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, पुण्यातील तस्कर ललित पाटील, नाशिक व छत्रपती संभाजीनगरात अमलीपदार्थ तयार करणार्या कारखान्यांवरील छापे या त्या ठळक घटना आहेत. याबाबतच्या तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज या मान्यवर व्यक्त करत आहेत.

मुंबईत तस्करांविरोधात मोहिम

पो लिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने मुंबईत गेल्या पाच वर्षांत असंख्य कारवाया केल्या. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. दीड महिन्यापूर्वी गृह खात्याने ‘नार्कोटिक्स टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा शासननिर्णय काढला होता. या टास्क फोर्सचा प्रमुख पोलिस महासंचालकपदाचा अधिकारी असणार आहे. त्याचे मुख्यालय पुण्यात असेल. संबंधित पथक सीआयडीअंतर्गत स्वतंत्रपणे काम करणार आहे; परंतु आजही ते कागदावरच आहे.

smok
Smoking News : शहरभर सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; तंबाखूच्या पिचकाऱ्या अन्‌ सिगारेटचा धूर सुरूच

मुंबईत जनजागृती

मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकातर्फे वर्षभर जनजागृती सुरू असते. शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जागृती केली जाते. सुरुवातीला सिगारेट पिण्याऐवजी ई-सिगारेटचा वापर केला जात होता. इलेक्ट्रिक सेल ॲक्टअंतर्गत अशा सिगारेटसुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून ती ड्रग्जच्या आहारी जाणार नाहीत, असे अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सागितले. जानेवारीच्या सुरुवातीला अमलीपदार्थविरोधी पथकाने ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत शाळा- महाविद्यालयांत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरातही छापा

अहमदाबाद येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ‘डीआरआय’च्या पथकाने गेल्या ऑक्टोबरमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात कारवाई करून तब्बल २३ किलो कोकेन, ७.४ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन आणि ९.३ किलो मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण असा साठा आणि ३० लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये अमलीपदार्थांचे उत्पादन करणारा कारखाना असल्याची माहिती ‘डीआरआय’ पथकाला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय अहमदाबादच्या झोनल युनिट आणि गुन्हे शाखेने २० ऑक्टोबर २०२३ रोजी पैठण रोडवरील कांचनवाडी येथील एका घरावर छापा मारला. यावेळी सदर घरातून वरील साठा आढळून आला. त्यानंतर या पथकाने पैठण एमआयडीसीमधील मेफेड्रोन आणि केटामाईनच्या उत्पादनात गुंतलेल्या महालक्ष्मी इंडस्ट्रीज नावाचा कारखान्यावर छापा टाकला. कारवाईनंतर या कंपनीत ४.५ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन व ९.३ किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण आढळून आले. या कारवाईत जप्त केलेल्या अमलीपदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे बाजारमूल्य हे २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे.

smok
Nashik Drug Case: जायभावेकडे सापडला पावणेतीन लाखांचा MDचा साठा! पुन्हा मुंबईपर्यंत धागेदोरे; 25 पर्यंत कोठडीत वाढ

रायगड जिल्ह्यातून परदेशात तस्करी!

रायगड जिल्ह्यात पोलिसांनी गतवर्षी आठ हजार कोटींचा गांजा, २१९ किलो चरस आणि ३१४ किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. या प्रकरणात १८ गुन्हे दाखल करून २३ जणांना अटक झाली. जिल्ह्यातून परदेशातही अमलीपदार्थांची तस्करी सुरू झाल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी नुकतीच खोपोलीत मोठी कारवाई करून १७४.५ किलो वजनाचे २१८ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले आहे. याआधी आठ डिसेंबर रोजी ८५ किलो २०० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील समुद्रकिनारी चरसची पाकिटे किनारपट्टीवर मोठ्या‍ प्रमाणावर आढळून आली होती.

नागपुरात ५०० किलो गांजा

ट्रकच्या कंटेनरमध्ये वेगळा कप्पा करून छुप्या पद्धतीने गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्याची कामगिरी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच केली आहे. तब्बल ५०० किलो गांजा लपवून त्याची तस्करी सुरू केली होती. नागपूर पोलिसांनी बुटीबोरी येथे सापळा रचत ही कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपीसह तब्बल ६९ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुण्यात ५०४ आरोपींना अटक

राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या वर्षभरात पोलिसांनी १४ कोटी ५५ लाख रुपये किंमतीचे अमलीपदार्थ जप्त केले. पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलिस, तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अमलीपदार्थ विक्री प्रकरणात ५०४ आरोपींना अटक केली आहे. अमलीपदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पलायनानिमित्ताने पुणे शहरातील अमलीपदार्थाची बाजारपेठ चर्चेत आली आहे.

मुंबईत १,७१८ आरोपींना अटक

मुंबई पोलिसांनी २०२३ मध्ये १३१९ गुन्ह्यांमध्ये एकूण ४३७ कोटी ९८ लाखांचे अमलीपदार्थ जप्त केले. या प्रकरणात १७१८ आरोपींना अटक करण्यात आली. वर्षभरातील कारवाईत साडेसात कोटींचा गांजा, ५० लाखांचे कोकेन, १० कोटींचे चरस, चार कोटी २१ लाखांचे हेरॉईन आणि इतर प्रकारचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. ठाणे शहर पोलिसांनी २०२३ या वर्षात सुमारे चार कोटी रुपयांच्या अमलीपदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील वडवली खाडीकिनारी आयोजित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून डीजेच्या तालावर नशेत झिंगणाऱ्या ९५ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते. या कारवाईत सुमारे आठ लाख रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व तरुण-तरुणी १८ ते २५ वयोगटांतील होते.

नवी मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने २०२३ या वर्षामध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करून एकूण ३५३ आरोपींना अटक केली. २९० कारवायांमध्ये सुमारे २३ कोटी रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमलीपदार्थ जप्त केले. उल्लेखनीय म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहिमेद्वार सात महिलांसह ३० परदेशी नागरिकांची धरपकड करून अमलीपदार्थाच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com