भाव मिळत नाही! पिकांवर रोटर फिरवण्यासाठी अनुदान मिळावं; शेतकरी पुत्राचं थेट राष्ट्रपतींना पत्र

मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे
भाव मिळत नाही! पिकांवर रोटर फिरवण्यासाठी अनुदान मिळावं; शेतकरी पुत्राचं थेट राष्ट्रपतींना पत्र
esakal

मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे. मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही.

त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान एका शेतकरी पुत्राने या परस्थितीला कंटाळून थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच पत्र लिहिलं आहे.

भाव न मिळणाऱ्या पिकामध्ये रोटर फिरवण्यासाठी प्रति एकर किमान 2 हजार रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.

पत्रात लिहिलं आहे की, आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला काही दर मिळत नसल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे.

भाव मिळत नाही! पिकांवर रोटर फिरवण्यासाठी अनुदान मिळावं; शेतकरी पुत्राचं थेट राष्ट्रपतींना पत्र
Thackeray vs Shinde : "न्यायालयाने शिंदे गटाला आरसा दाखवला" ; सुनावणीत काय घडलं? मुद्द्यात समजून घ्या...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे 500 ते 600 किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिवरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रकमे इतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय. त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये.

आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. कुठलही पीक केलं तरी तिचं अवस्था निर्माण होतेय. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

भाव मिळत नाही! पिकांवर रोटर फिरवण्यासाठी अनुदान मिळावं; शेतकरी पुत्राचं थेट राष्ट्रपतींना पत्र
कसब्यात कोण बाजी मारणार? चिंचवडमध्ये कुणाच्या अस्तित्वाला धक्का लागणार? उद्या कळणार Kasba Chinchwad By-Election Result

शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी 2000 ते 2500 रुपये लागतात. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमालचं विकला नाही, तर तिथं शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.

आज शेतकऱ्यांना 2 रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळतेय, पण तोच कांदा बाजारात सामन्यांना 20 रुपये किलोने विकला जातोय. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे.

आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर 2 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com