
शिक्षकांना आजपासून उन्हाळा सुटी! सुटीतही सहावी ते आठवीचे ‘शिष्यवृत्ती’चे तास
सोलापूर : कोरोना काळात बंद असलेल्या शाळा फेब्रुवारीत सुरु झाल्या. एप्रिलअखेर शाळा सुरु राहिल्या. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर आता शाळांना सुटी लागली आहे. शिक्षकांना (ता. २) पासून सुटी लागली असून १२ जूनपर्यंत उन्हाळी सुटी असणार आहे. पण, सुटीतही सहावी ते आठवीच्या मुलींना शिष्यवृत्तीचे धडे दिले जाणार आहेत.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
कोरोनामुळे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा दोन वर्षे बंद राहिल्या होत्या. फेब्रुवारीपासून शाळा उघडल्या आणि पालकांना दिलासा वाटला. पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा कमी कालावधीसाठी सुरु होत्या. दहावी ते बारावीचे वर्ग नियमित ऑफलाइन सुरु राहिले. मुलांची गुणवत्ता घसरल्याने आता त्यांना उपचारात्मक अध्यापन केले जाणार आहे. उन्हाळी सुटीत पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांनी मुलांना सूचना कराव्यात, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांना तसे पत्रही दिले आहे. पुढील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरु होणार आहे. पहिली ते पाचवीचे वर्ग उन्हाळी सुटीत बंद राहणार आहेत. पण, सहावी ते आठवीच्या मुलांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, अनेक शाळांमधील शिक्षकांनी पटसंख्या पुरेसी व्हावी म्हणून मुलांचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, जिल्ह्याचा शिष्यवृत्तीत टक्का वाढावा म्हणून प्रत्येक शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांनी केल्या आहेत.
हेही वाचा: ५६ रुपयांच्या इंधनाची किंमत १२० रुपये। पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कोणी कमी करायचा?
ठळक बाबी...
- शाळांना १२ जूनपर्यंत राहणार उन्हाळी सुटी
- १३ जूनपासून सुरु होणार नवीन शैक्षणिक वर्ष; सर्व शाळा त्यावेळी सुरु होणार आहे
- पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरुच राहणार; मुलांचे शिष्यवृत्तीचे घेतले जाणार तास
- मुख्याध्यापकांच्याा नेतृत्वाखाली शिक्षक देणार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धडे
हेही वाचा: विद्यापीठाची २५ मेपासून परीक्षा ऑफलाईनच! १५ मिनिटांचा ज्यादा वेळ
झेडपी शाळांची कमी होतेय पटसंख्या
जिल्ह्यात झेडपीच्या दोन हजार ७९८ शाळा आहेत. या शाळांमध्ये दोन लाख एक हजार ७९२ विद्यार्थी आहेत. मागील काही वर्षांत झेडपी शाळांमधील पटसंख्या घटली आहे. सध्या २० पेक्षा कमी असलेल्या ४९ शाळा आहेत. आगामी शैक्षणिक वर्षांत मुलांची शाळा कमी होऊ नये म्हणून शिक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
Web Title: Summer Vacation For Teachers From Today Holiday Hours From 6th To
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..