२२ हजार कुटुंबांना रिक्षांचा आधार! सरकारी नोकरीचा नाद सोडून तरूणांच्या हाती रिक्षा; सोलापुरात धावतात १७ हजारांवर रिक्षा

महापालिकेची परिवहन व्यवस्था कोलमडली आणि शहरात रिक्षांची संख्या भरमसाट वाढली. मुंबई, पुण्यात टॅक्सी आणि सोलापुरात रिक्षा अशी सद्य:स्थिती आहे. सध्या सोलापूर शहरात १७ हजार २४५ रिक्षा धावत आहेत. २२ हजारांवर कुटुंबांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे.
रिक्षा solapur news
रिक्षा solapur newsesakal

सोलापूर : महापालिकेची परिवहन व्यवस्था कोलमडली आणि शहरात रिक्षांची संख्या भरमसाट वाढली. मुंबई, पुण्यात टॅक्सी आणि सोलापुरात रिक्षा अशी सद्य:स्थिती आहे. सध्या सोलापूर शहरातील रस्त्यांवरून १७ हजार २४५ रिक्षा धावत असल्याचे आरटीओ कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. तब्बल २२ हजारांवर कुटुंबांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे.

शासकीय नोकरीची मर्यादित संख्या, एका जागेसाठी ३५०हून अधिक अर्ज, वर्षानुवर्षे परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही. दुसरीकडे व्यवसायात मंदी, स्थलांतर परवडणारे नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक तरूणांनी बॅंकांच्या मदतीने रिक्षा खरेदी केली आणि त्यावर आता त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवत आहेत.

स्मार्टसिटीत येणाऱ्या प्रवाशांची अहोरात्र सेवा करणाऱ्या या रिक्षाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र महामंडळ (बांधकाम कामगार वगैरे) सुरू केली, पण रिक्षाचालकांसाठी तसे काहीही नाही. दरम्यान, सोलापूर शहरातील महापालिकेची परिवहन व्यवस्था सध्या कोलमडली असून अवघ्या २२ ते २५ संपूर्ण शहरासाठी आहेत. त्यातून तरुणांना रिक्षांचा पर्याय योग्य वाटला आणि दोन वर्षांपूर्वी आठ-दहा हजारांवरील रिक्षा आता १७ हजारांवर पोचल्या आहेत.

रिक्षांसाठी शहरात नाहीत थांबे, मीटरही नाही

शहरातील २२ हजारांहून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीची वाट पाहून रिक्षा चालवू लागले आहेत. दरम्यान, रिक्षाला मीटर असावे अशी आम्ही आग्रही आहोत. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी सोलापूर शहरात रिक्षांसाठी वेगवेगळ्या मार्गांवर आरटीओ कार्यालयाकडून २४७ थांबे मंजूर झाले. पण, ते कोठे आहेत याची रिक्षाचालकांनाच माहिती नाही.

- अमोल डुरके, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना रिक्षाचालक संघटना, सोलापूर

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले, पण शेवटी रिक्षा घेतली

बीएएसी शिक्षण पूर्ण केले असून पदवीला ७० टक्के गुण आहेत. पोलिस भरतीसह विविध शासकीय विभागातील नोकरीसाठी प्रयत्न केले. नोकरी लागत नसल्याने शेवटी दीड वर्षापूर्वी रिक्षा घेतली आणि रिक्षावर कुटुंब चालवतो आहे. असे अनेक तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.

- रमेश राठोड, रिक्षाचालक, सोलापूर

रिक्षांसाठी थांबे अन् मीटर का नाही?

प्रवासी मिळो वा न मिळो दररोज पहाटे चार ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे दोन वाजेपर्यंत रिक्षा चालक वेगवेगळ्या रस्त्यांवरून प्रवाशांना सेवा देतात. पण, सध्या शहरात फिक्स थांबे नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, आसरा चौक, रंगभवन अशा वेगवेगळ्या चौकांमध्ये गर्दी करून रिक्षाचालक थांबतात. अशावेळी थांबे आवश्‍यक असून रिक्षाचालक व प्रवाशांच्या फायद्याचे मीटर रिक्षांमध्ये का बसविले जात नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मीटर असल्याशिवाय आरटीओकडून रिक्षाचे पासिंग होत नाही, मग मीटर नसतानाही पासिंग होतेच कशी, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

शाळकरी मुलांना रिक्षावाल्या काकांची मदत

सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे बहुतेक पालकांचा कल वाढला आहे. स्कूलबसचे शुल्क भरणे काही कुटुंबांना शक्य नाही. अशावेळी एकाच गृहनिर्माण सोसायटीतील किंवा नगरातील शाळकरी मुलांना तेथील रिक्षावाले काका पालकांप्रमाणेच काळजीपूर्वक शाळेतून ने-आण करतात ही वस्तुस्थिती आहे. सध्या सोलापूर शहरातील १० हजारांवर मुले रिक्षातूनच शाळेत जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com