Shiv Sena Case : सरकार टिकावे अन् मुख्यमंत्री शिंदे हेच कायम राहावे; अब्दुल सत्तार

कृषीमंत्री अब्दुल सत्तार; चिकलठाणा विमानतळावर माध्यमांना दिली प्रतिक्रिया
Supreme Court Final Decision on Shiv Sena Case abdul sattar Chief Minister eknath Shinde remain maharashtra politics
Supreme Court Final Decision on Shiv Sena Case abdul sattar Chief Minister eknath Shinde remain maharashtra politics esakal

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रिम कोर्टाचा निकाल गुरुवारी (ता.११) येणार आहे. तो कायद्याने आमच्या बाजूनेच लागला पाहिजे, आमचे सरकार टिकावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच कायम राहावे यासाठी अनेक लोक पूजा-पाठ करत आहेत, पण शेवटी सुप्रिम कोर्ट आहे.

Supreme Court Final Decision on Shiv Sena Case abdul sattar Chief Minister eknath Shinde remain maharashtra politics
Shivsena Hearing : सर्वपक्षीयांना धाकधूक; राज्यातील सत्तासंघर्षाबाबत आज 'सुप्रीम' फैसला शक्य

उद्याचा निकाल आमच्या विरोधात गेला तरी आम्ही त्याचे स्वागत करू, अशी धक्कादायक प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गुरुवार (ता.१) रोजी या निकालाचे वाचन होणार आहे, या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात काय उलथा-पालथ होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील यावर भाष्य केले.

Supreme Court Final Decision on Shiv Sena Case abdul sattar Chief Minister eknath Shinde remain maharashtra politics
Jayant Patil : राष्ट्रवादीला मोठा धक्का; जयंत पाटील यांना EDची नोटीस

सत्तार म्हणाले, तुमच्या प्रमाणेच आम्हाला देखील उद्याच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. हा निकाल आमच्या बाजूने लागावा. कायद्यानुसार तो लागेलही. पण जर निकाल आमच्या विरोधात गेला, तरी देखील आम्ही त्याचे स्वागतच करू. कारण शेवटी सुप्रिम कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेला निकाल हा मान्य करावाच लागतो.

परंतु सत्तासंघर्षाचा निकाल आमच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेच्या बाजूने लागेल, असा मला विश्वास आहे. काही लोक निकाल आमच्या विरोधात जावा, त्यांच्या बाजूने लागावा, यासाठी गणपती बाप्पाला पाण्यात ठेवून बसले आहेत.

चंद्रकांत खैरे देखील पूजा-पाठ करत आहेत. पण आमचे मुख्यमंत्री त्यांच्या पेक्षा जास्त हिंदुत्ववादी आहेत. आमचे सरकार टिकावे, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच कायम राहावेत, यासाठी देखील पूजापाठ सुरू असल्याचा टोला सत्तार यांनी खैरेंना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com