डान्स बारमधील ऑर्केस्ट्राबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dance bar

डान्स बारमधील ऑर्केस्ट्राबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

दिल्ली: बारमधील (Dance Bar) ऑर्केस्ट्रामध्ये पुरुष आणि महिला कलाकारांची संख्या प्रत्येकी चार असावी असा आदेश राज्यात पोलिसांनी (Maharashtra Police) जारी केला होता. ऑर्केस्ट्रामध्ये फक्त ८ लोक असावेत ही मर्यादा घातली जाऊ शकते, मात्र त्यामध्ये पुरूष किती अन् महिला किती हे ठरवणं योग्य नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. पोलिसांनी लादलेली ही लिंग मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली असून आहे. (Supreme Court Removed Gender cap in bar orchestra)

हेही वाचा: शालेय माध्यान्ह भोजन योजना अर्थसंकल्पात १ हजार २६७ कोटींची कपात

मुंबई पोलिसांनी रेस्टॉरंट्स आणि बारसाठी लागू केलेल्या अटींनुसार, महिला आणि पुरुषांची संख्या समान अर्थात प्रत्येकी ४ अशी असावी. फक्त तेवढ्याच लोकांना स्टेजवर परवानगी असावी असा नियम लागू केला होता. मुंबईत डान्स बारसाठी परवाना घेतलेल्या 250 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स आहेत.

हेही वाचा: निर्बंध मार्चमध्ये कमी होणार; राजेश टोपेंनी दिली माहिती

पोलिसांनी लागू केलेली ही अट बेकायदेशीर असल्याचे सांगत, ती रद्दबातल करत न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि एस रवींद्र बात यांच्या खंडपीठाने सांगितले की, पुरूष आणि स्त्रियांच्या संख्येवरी निर्बंधांच्या या अटीमुळे आपला पुर्वग्रह दुषित दृष्टिकोण दिसून येतो. या क्षेत्रात समाजातील एक विषेश वर्ग अडकला आहे, त्यांना दुर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Web Title: Supreme Court Remove Gender Cap In Orchestra Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme Court
go to top