
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे खरंच मनापासून कौतुक ! : प्रीतम मुंडे
बीड : राज्य सरकारच्या कामाविषयी म्हणाल, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचे खरचं मनापासून कौतुक करते. त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हा (कोरोनाचा) विषय हाताळलेला आहे, असे कौतुक उद्गार भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी काढले. आज सोमवारी (ता.१८) त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, राजकीय मंचावरती आपण एकमेकांवर आरोप करतो. आरोप-प्रत्योराप करण्याचे विषय हे वेगळे असतात. पण आरोग्य विषय हा कोरोनाशी सामना करत असताना केंद्र सरकार ज्या पद्धतीने सर्तक होतं आणि सतत लोकांचं काळजी घेण्याचं काम करत होतं. (Pritam Munde Admire Health Minister Rajesh Tope Works)
हेही वाचा: UPSC च्या नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...
महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील मोठं राज्य आहे. येथे लोकसंख्या दाट आहे. अनेक स्थलांतरित कामगार सुद्धा इथे आहेत. या सगळ्यांकडे लक्ष देत असताना महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने काम झालेले आहे. धर्मा-धर्मामध्ये दुही निर्माण होते हे निश्चितच निराशाजनक आहे. त्यामुळे येथे कोणाविषयी बोलण्याचं कारण नाही. पण या गोष्टी अगोदर आपल्या समाजात गुण्यागोविंदाने नांदत होत्या.
हेही वाचा: 'प्रीतम मुंडे यांनी कुठल्या कंत्राटदाराकडून पैसे घेतले आहेत का ?'
पण अचानक आलेली ही विषमता निश्चितच अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी सर्वच राजकीय पक्षांना या विषय तोडगा काढावा लागेल, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी देशात वाढत्या चाललेल्या धार्मिक तेढबाबत दिली.
Web Title: Pritam Munde Admire Health Minister Rajesh Tope Works
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..