
पद्मसिंह पाटील यांचा आयुष्यभर आदर व सन्मानाच असेल, सुप्रिया सुळे भावूक
उस्मानाबाद : डॉ.पद्मसिंह पाटील यांचा मी, दादा व राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आयुष्यभर आदर व सन्मानाच असेल, असे परखड मत खासदार सुप्रिया सुळे यानी उस्मानाबादेत केले. त्या पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी पक्ष सोडुन गेलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली. डॉ.पद्मसिंह पाटील (Padamsinha Patil) यांचे मूळगाव असलेल्या तेरमध्ये आज सुप्रिया सुळे (Supriya Sule) यानी दौरा केला. त्या ठिकाणी पाहणी करुन तेथील विकासाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय तेर हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सासरवाडी असुन त्यांनाही मी या गावाकडे लक्ष देण्याची मागणी करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. (Supriya Sule Express Respect To Padamsinh Patil In Osmanabad)
हेही वाचा: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही - संजय राऊत
या सगळ्यामध्ये डॉ.पद्मसिंह पाटील व शरद पवार यांच्या ऋणानुबंधाच्या आठवणी सुप्रिया सुळे लपवु शकल्या नाहीत. त्यावर थेटपणे भाष्य करत डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये किती आदराची भावना आहे हे त्यांनी सांगितले. डॉ.पद्मसिंह पाटील व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये पाच दशकाहुन अधिक काळाचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे डॉ.पाटील यांच्याबद्दल माझ्या, दादाच्या (अजित पवार) व राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आयुष्यभर आदर व सन्मानच असणार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकी अगोदर डॉ.पद्मसिंह पाटील व त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकुन भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा: न्यायालयात जाणार, चंद्रकांत खैरेंनी तयार राहावे; वंचित बहुजन आघाडीचा इशारा
त्यानंतर राणा पाटील हे तुळजापुर मतदारसंघातून आमदारही झाले. पण एकहाती कारभार सोपविलेल्या शिलेदारांनेच राष्ट्रवादी पक्ष सोडल्याने संघटनात्मक मोठी पोकळी तयार झाली आहे. या अगोदरही शरद पवार यांनी थेटपणे नाव न घेता या घराण्यावर जाहीर टीका केली होती. मात्र आता सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भुमिका यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सूरु झाल्याचे दिसुन येत आहे. डॉ.पाटील व राणा पाटील यांना पक्ष सोडल्यापासुन पक्षाला येथे सक्षम नेतृत्वही मिळालेले नाही. राष्ट्रवादीची शक्ती अगदी मर्यादित राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा काळात पक्षात सर्वसामान्य नेतृत्व तयार होण्याची शक्यता आता तरी धुसर असल्याचे चित्र आहे. त्याच वेळी सुप्रिया सुळे यांनी डॉ.पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे अनेक अर्थ निघणार हे उघड आहे. शरद पवार यांनी मध्यंतरी जिल्ह्यात एक सामान्य कार्यकर्तीच्या कार्यक्रमाला हजर राहुन एक प्रकारचा संदेश दिला होता.
Web Title: Supriya Sule Express Respect To Padamsinh Patil In Osmanabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..