esakal | यंदाची 'स्वाभिमानी' ची ऊस परिषद 19 ऑक्‍टोबरला ; राजू शेट्टी: FRP
sakal

बोलून बातमी शोधा

Raju shetti

एफआरपी चे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात नवरात्री पासून' जागर एफआरपीचा आराधना शक्तीस्थळांची' आंदोलन.

यंदाची 'स्वाभिमानी' ची ऊस परिषद 19 ऑक्‍टोबरला ; राजू शेट्टी

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची ऊस परिषद जयसिंगपूर येथे 19 ऑक्टोबरला होणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता.29) पत्रकार परिषदेत केली. पूरग्रस्तांची नुकसान भरपाई मिळाली नाही तर एकाही मंत्र्याला दिवाळी गोड होऊ देणार नाही. असा इशारा राजू शेट्टी यांना दिला.आज कोल्हापुरात पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

एफआरपी चे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात नवरात्री पासून' जागर एफआरपीचा आराधना शक्तीस्थळांची' हे आंदोलन जोतिबा डोंगरावरून सुरू करणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. विविध राज्यातील विविध शक्ती स्थळांची आराधना करत दसऱ्याला जेजुरी येथे मेळाव्याद्वारे या आंदोलनाची सांगता होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

पूढे ते म्हणाले,15 ऑक्टोबर पासून कारखाने सुरू करायला मंत्री समितीने परवानगी दिलीय. राज्य सरकार ने परवानगी दिली असली तरी स्वाभिमानीच्या ऊस परिषदे शिवाय पश्चिम महाराष्ट्रात कारखाने सुरू होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या परिषदेत सध्याची साखर हंगामाची स्थिती, शेतकऱ्यांची स्थिती, पूरग्रस्तांची स्थिती यावर सविस्तर चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. दुपारी एक वाजता जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर ही परिषद होणार आहे.

हेही वाचा: MPSC Result: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: सरूडच्या दीर-भावजेची बाजी

कारखान्यांना यंदा चांगले दिवस आले आहेत, साखरेचे दर 3800 रुपये क्विंटलपर्यंत गेल्याने कारखान्यांना यंदा एफ आर पी देणे सहज शक्य आहे परंतु केंद्र सरकार राज्य सरकार व कारखानदार मिळून एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा घाट घालत आहेत याला आम्ही विरोध करणार आहोत.यावेळी जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांच्यासह स्वाभिमानी चे पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top