घरी जेवण मागवताय? Swiggy चा सर्व्हर डाऊन

swiggy delivery boy objectionable behavior in front of girl student
swiggy delivery boy objectionable behavior in front of girl student

फूड डिलिव्हरी करणारे वेगवेगळे अॅप हे सध्या अनेकांची भूक भागवण्याचं काम करतात. हवं तेव्हा पाहिजे असलेलं आवडतं जेवण, फास्ट फूड मागवण्यासाठी हा सध्याचा ऑप्शन अनेकांच्या दैनंदिन जीवनातला भाग झालाय. यातलंच एक म्हणजे स्विगी. देशातील लाखो लोक सध्या हे अॅप वावरून खाण्यापिण्याच्या गोष्टी मागवतात. मात्र काही काळ हे अॅप बंद झालं होतं.

ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप स्विगीचा (Swiggy) सर्व्हर डाऊन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अॅप डाऊन झाल्याने कोणत्याही ऑर्डर्स प्लेस होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अॅपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेहमी मागवत असलेल्या रेस्टॉरंट्सची नावं दिसतात. अथवा तुमच्या नजिकचे फूड डिलीव्हरी पर्याय समोर येतात मात्र, आता नो सर्व्हिस असल्याचं समोर येतंय. जवळपास ३० मिनीटांपासून काही तांत्रिक कारणामुळे हे घडल्याचं सूत्रांनी सांगितलं. यानंंतर स्विगीची सेवा पुन्हा सुरू झाली आहे.

swiggy delivery boy objectionable behavior in front of girl student
Zomato Down! 'ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाही'; ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

मुंबई आणि पुण्यातही हीच परिस्थिती असल्याचं वापरकर्त्यांनी सांगितलंय.

याआधी ZOMATO ही डाऊन

मागील आठवड्यात ट्विटरवर अनेक युजर्सनी झोमॅटो बंद झाल्याच्या तक्रारी करत ट्विट केले होते. झोमॅटो हे अॅप ओपन केल्यानंतर "सध्या आम्ही ऑर्डर स्वीकारत नाहीये. काही वेळानंतर पुन्हा सुरु होईल." असा मेसेज दिसत होता. असाच प्रकार आता स्विगी सोबत झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com