Setu Kendra : महाऑनलाइन पोर्टलचा बट्ट्याबोळ; आपले सरकार कोमात, हेलपाटे मारून नागरिक त्रस्त

प्रवेश प्रक्रियेच्या ऐन धावपळीच्या काळात महाऑनलाइन पोर्टलचा (Mahaonline Portal) बट्ट्याबोळ झाला आहे.
Mahaonline Portal
Mahaonline Portalesakal
Summary

मागील तीन दिवसांपासून महाऑनलाइन पोर्टल अक्षरशः ठप्प झाले आहे. एकही दाखला ऑनलाइन होत नसल्याने सेतू केंद्रातील कर्मचारी वैतागून गेले आहेत.

दहिवडी : प्रवेश प्रक्रियेच्या ऐन धावपळीच्या काळात महाऑनलाइन पोर्टलचा (Mahaonline Portal) बट्ट्याबोळ झाला आहे. ‘आपले सरकार कोमात’ गेल्याने सामान्य जनतेचे हाल सुरू असून, हेलपाटे मारून नागरिक त्रस्त झाले आहेत.

जून महिना हा विविध शैक्षणिक प्रवेश प्रक्रियांचा महिना असतो. महत्त्वपूर्ण प्रवेशांसाठी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी शासनाच्या सेतू केंद्रात पालक व पाल्यांची धावपळ सुरू असते. त्यातच या महिन्यात अंगणवाडी, वन विभाग असो वा इतर शासकीय नोकऱ्यांसाठी भरती निघाल्याने त्यानिमित्ताने सुद्धा नोकरी इच्छुकांची दाखले काढण्यासाठी गर्दी होत आहे.

Mahaonline Portal
PM मोदींना देशाची तर सोनिया गांधी, शरद पवारांना स्वतःच्या मुलाबाळांची चिंता; बावनकुळेंचा विरोधकांवर निशाणा

अशा या अतिमहत्त्वाच्या काळात शासनाच्या आपले सरकारचे महाऑनलाइन पोर्टलने मान टाकली आहे. मागील काही दिवसांपासून सर्व्हर अतिशय संथगतीने सुरू असल्याचा त्रास सामान्य जनतेला होत होता. त्यामुळे एका-एका दाखल्यासाठी हेलपाटे मारून पालक त्रस्त झाले होते.

याचा कहर म्हणजे मागील तीन दिवसांपासून महाऑनलाइन पोर्टल अक्षरशः ठप्प झाले आहे. एकही दाखला ऑनलाइन होत नसल्याने सेतू केंद्रातील कर्मचारी वैतागून गेले आहेत, तर दाखले मिळत नसल्याने जनतेचा संताप अनावर होऊन ते हमरीतुमरीवर येत आहेत. शासनाने तत्काळ यावर उपाययोजना करून महाऑनलाइन पोर्टल सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

Mahaonline Portal
Siddheshwar Factory : कारखान्याची चिमणी पाडण्यात भाजपचा हात? काडादींच्या आरोपांना थोबडेंचं सडेतोड उत्तर

नागरिकांना दाखले वेळेत मिळावेत, हा आमचा प्रयत्न असतो; परंतु महाऑनलाइन पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे सध्या ते शक्य होत नाही. ही अडचण राज्यस्तरावर असून, लवकरच ती दूर होऊन दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू होईल.

विकास अहीर, तहसीलदार

माझी मुलगी बारावी उत्तीर्ण झाली असून, तिच्या पुढील शिक्षणासाठी विविध दाखल्यांची गरज आहे; परंतु महाऑनलाइन पोर्टलच्या गचाळ कारभारामुळे मागील आठ दिवसांपासून मला साधा उत्पन्नाचा दाखला मिळू शकला नाही.

- कृष्णा नामदेव जाधव, पालक, दहिवडी

Mahaonline Portal
उदयनराजे-शिवेंद्रराजे वादाची प्रदेशाध्यक्षांनी हवाच काढली; बावनकुळे म्हणाले, रस्त्यावरची भांडणं ही भाजपची..

आम्ही लोकांना जास्तीतजास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. शनिवार, रविवार, तसेच दिवसा वा रात्रीसुद्धा कर्मचारी काम करत आहेत. मात्र, महाऑनलाइन पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आम्हाला वेळेत काम करण्यात अडचण येत आहे.

- नितीन राजेमाने, सेतू केंद्र चालक, दहिवडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com