तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

सोलापुरात तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेला असून केवळ पाण्याने हायड्रेट होणे कठीण आहे. या काळात पोषणयुक्त हायड्रेशन अधिक गुणकारी ठरते. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन (डिहायड्रेशन) थकवा, डोकेदुखी आणि उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. त्यासाठी पारंपरिक आणि नैसर्गिक पेयांचा आधार घेणे आवश्यक आहे.
मुलांची घ्या काळजी

मुलांची घ्या काळजी

Sakal
Updated on

सोलापूर : सोलापुरात तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेला असून केवळ पाण्याने हायड्रेट होणे कठीण आहे. या काळात पोषणयुक्त हायड्रेशन अधिक गुणकारी ठरते. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन (डिहायड्रेशन) थकवा, डोकेदुखी आणि उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. त्यासाठी पारंपरिक आणि नैसर्गिक पेयांचा आधार घेणे आवश्यक आहे. खाद्य परंपरेत ज्वारीच्या आंबिलला विशेष महत्त्व आहे. ज्वारीचे आंबिल हे केवळ तहान भागवत नाही, तर ते एक उत्तम प्रोबायोटिक म्हणून काम करते. ज्वारी थंड गुणधर्माची असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे. हायड्रेशनसाठी अनेकविध पदार्थ व फळे वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे शरिराची पाण्याची गरज भागून सुपोषण देखील होते.

कलिंगड

  • घटक : यात 'लायकोपीन' नावाचे अँटी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ए व सी असते.

  • फायदा : हे शरीराला त्वरित थंडावा देते आणि स्नायूंचा थकवा कमी करण्यास मदत करते.

  • -----------------------------------

संत्री, मोसंबी

  • घटक : व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर.

  • फायदा : रोगप्रतिकारशक्ती आणि रक्ताभिसरणात वाढ

  • ---------------------------

काकडी

  • घटक : व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम.

  • फायदा : शरीराला डिटॉक्स करते आणि त्वचा टवटवीत ठेवते.

  • ------------------------

द्राक्षे

  • घटक : रेस्वेराट्रोल (Antioxidant) आणि नैसर्गिक शर्करा.

  • फायदा : मेंदूचे कार्य व तात्काळ ऊर्जेसाठी फायदेशीर.

  • -------------------------------

  • शहाळे

  • मुख्य घटक : पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि नैसर्गिक साखर.

  • फायदा : शरीरातील पाण्याचे प्रमाण त्वरित संतुलित करते आणि थकवा दूर करते.

  • ---------------------------

ताक

  • मुख्य घटक : प्रोबायोटिक्स, व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम आणि रिबोफ्लेविन.

  • फायदा : पचन सुधारते आणि शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी राखते.

  • --------------------------

ज्वारीचे किंवा नाचणीचे आंबिल

  • मुख्य घटक : लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रथिने आणि भरपूर फायबर

  • फायदा : ऊर्जा टिकवून ठेवते आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण

  • ----------------------

लिंबू पाणी

  • घटक : व्हिटॅमिन सी, सायट्रिक ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स.

  • फायदा : रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीर डीटॉक्स करते.

  • --------------------------

पन्हे, कोकम सरबत

  • मुख्य घटक : जीवनसत्त्वे (ए, सी), लोह आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक.

  • फायदा : उष्माघातापासून संरक्षण आणि भूक वाढवण्यास मदत

कधी काय घ्यावे...

  • सकाळी व्यायामानंतर शहाळे प्यावे

  • सकाळच्या न्याहारीत आंबिल घ्यावे

  • दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावे

  • अपचन व उष्णतेसाठी कोकम घ्यावे

  • दिवसभरात जलयुक्त फळे खावीत

जलयुक्त फळे खा पण अतिथंड नको

जलयुक्त फळे खाताना ती फ्रीजमध्ये अतीथंड करून न खाता सामान्य तापमानात ठेवून खावीत. उपाशीपोटी फळे न खाता जेवणानंतर घ्यावीत. दूध व फळे एकत्र खाऊ नयेत. साखरेऐवजी खडीसाखरेचा उपयोग सरबतात करावा.

- डॉ. दीपा नवले, आहारतज्ज्ञ, सात रस्ता सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com