राज्यात सर्वांना हुडहुडी, मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पारा घसरला

राज्यात सर्वांना हुडहुडी, मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पारा घसरला
Updated on

राज्यातला तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय. वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे तापमानात घट झाली आहे. या पश्चिमी वाऱ्यांमुळे दरवर्षी उत्तर भारतात थंडीची लाट येते. मात्र, यंदा उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातातही त्याचा प्रभाव जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यभरात अचानक पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसभात राज्यभरात किमान तापमान कमी होऊन थंडी (Maharashtra Weather Forecast) वाढण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं (IMD) अंदाज व्यक्त केला आहे. तसेच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यताही वर्तवली आहे.

आज म्हणजेच 26 जानेवारीला मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यात तापमान आणखी घसरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली असणार आहे. २६ जानेवारीला राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात शीत दिवस व अतीशीत लहरीची शक्यता आहे. मुंबई दिवसा कमाल तापमानात घट झाली असून, हे कमाल तापमान २३ ते २६ अंश नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

'या' भागांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

मालेगाव, नाशिक 19.6

माथेरान - 23.6

औरंगाबाद - 24.7

नाशिक 23.6

ठाणे - 29

डहाणू - 25.6

अलिबाग - 25

जालना - 25.2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

mantralay
Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Marathi News Esakal
www.esakal.com