esakal | गुरुवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडणार, परीपत्रक जारी
sakal

बोलून बातमी शोधा

Temples

राज्यभरातील महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात माहिती प्रसारित केली असून देवस्थान ट्रस्टला याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत.

गुरुवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडणार, परीपत्रक जारी

sakal_logo
By
ओमकार वाबळे

कोरोनामुळे बंद असलेली धार्मिक स्थळे घटस्थापनेपासून म्हणजेच येत्या ७ ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवादातून घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने याबाबत परिपत्रक काढून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचेही आवाहन केले आहे. राज्यभरातील महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात माहिती प्रसारित केली असून देवस्थान ट्रस्टला याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा: मंदिरे, धार्मिक स्थळे गुरुवारपासून उघडणार

नवरात्रीचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेशही काढले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकारने धार्मिक स्थळ बंद केली होती. रुग्णांची संख्या कमी होत असताना मंदिरे खुले करावीत यासाठी राज्य सरकार विरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन केले होते. दरम्यान ७ ऑक्टोबर पासून मंदिर खुले होतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. त्यानुसार शासनाचे आदेश आल्यानंतर प्रशासनाने आदेश काढले आहेत.

हेही वाचा: Video- इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातीलही सर्व धार्मिक स्थळे उघडावीत

ट्रस्ट, धार्मिक व्यवस्थापन यांनी धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे केव्हा खुली असतील याची वेळ निश्चित करून याचे काटेकोर पालन करावे. धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा, थर्मल गणने तपासणी करावी, सॅनिटाइजरची सुविधा असावी. तसेच याठिकाणी गर्दी होणार नाही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाईल याकडे लक्ष ठेवावे असे आदेशात नमूद केले आहे.

loading image
go to top