esakal | "घातपाताचा कट होत असताना राज्य सरकार झोपलं होतं का ?"
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish shelar

"घातपाताचा कट होत असताना राज्य सरकार झोपलं होतं का ?"

sakal_logo
By
सुधीर काकडे

दिल्लीमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यावर भाजपने राज्य सरकारवर आरोप केले आहेत. राज्यात घातपाताचे कट होत असताना, पोलीस आणि एटीएस झोपलं होतं का? असा प्रश्न भाजप आमदार अशिष शेलार यांंनी उपस्थित केला आहे. राज्य सरकार पोलिसांना नको त्या कामात गुंतवत आहे, त्यामुळे त्यांना सुरक्षा विषयक कामांवर लक्ष देता येत नाही असेही अशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणावर उत्तर द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

उत्सवाच्या काळात घातपातचा कट करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केली. हिंदू सणांच्या पार्श्वभुमीवर कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना दाऊदचा भाऊ रसद पुरवत होता, पाकिस्थानात त्यांची ट्रेनिंग झाली. त्यातल्या दोन लोकांना महाराष्ट्रातून अटक केली, असे म्हणत पत्रकारांना आणि आमदारांना नोटीस देणारे पोलीस झोपलेले आहेत का? असा सवाल यावेळी आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: देश हादरवण्याच्या कटात जान महंमदचा सहभाग, राकेश अस्थाना मुंबईत

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने मंगळवारी दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळून लावला. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशातून सहा जणांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रातून अटक केलेला जान महंम्मद शेख उर्फ समीर कालिया हा सोमवारी सायंकाळपर्यंत मुंबईतच होता, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip walse patil) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

loading image
go to top