TET 2018 मध्येही पैसे घेऊन पात्र केलेल्या उमेदवारांची छाननी सुरू

2019-20 च्या उमेदवारांनंतर आता 2018 च्या परीक्षेतील उमेदवारही पोलिसांच्या रडारवर
TET-Exam
TET-ExamSakal

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) 2019-20 मध्ये सात हजार 880 जण अपात्र उमेदवार पात्र ठरविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता 2018 मध्ये "टीईटी' परीक्षेला बसलेले उमेदवारही पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सायबर पोलिसांकडून आता 2018 च्या परीक्षेत किती उमेदवारांना पैसे घेऊन पात्र करण्यात आले होते, याची माहिती काढण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे आता 2018 मध्ये अपात्र असूनही पात्र ठरलेले किती उमेदवार असणार आहेत, याची माहिती लवकरच पुढे येण्याची शक्‍यता आहे. (TET Exam Fraud)

पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोग्य, म्हाडा पाठोपाठ "टीईटी' परीक्षेतील गैरव्यवहारही पुढे आणला. त्यामध्ये दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आत्तापर्यंत "आयएएस' अधिकारी सुशील खोडवेकर, राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे, सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर, जी ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख, माजी संचालक अश्विन कुमार यांच्यासह अनेक दलालांना बेड्या ठोकल्या आहेत.

TET-Exam
तलवारी घेऊन युवकाचे थिरकणे पडले महागात; १० व्यक्तींवर गुन्हा

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना 2019- 20च्या टीईटी परीक्षेमध्ये अपात्र असूनही पैसे भरून सात हजार 880 उमेदवार पात्र ठरविल्याची माहिती पुढे आणली होती. या नावांची शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतर आता संबंधित उमेदवारांचे जबाबही नोंदविण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, सायबर पोलिसांनी आता 2018च्या टीईटी परीक्षेचा गैरव्यवहारही उघडकीस आणण्यास सुरुवात केली आहे. संबंधीत परीयेतही 2019-20 च्या परीक्षेप्रमाणेच अपात्र उमेदवार पैसे भरुन पात्र झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, पैसे देऊन पात्र झालेल्या उमेदवारांची पोलिसांकडून छाननी सुरू करण्यात आली आहे. त्यामधील संख्या किमान तीन हजारांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. या उमेदवारांच्या नावांची सध्या पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दलालांमार्फत हजारो उमेदवारांना पात्र करण्यासाठी लाखो रुपये घेतले असल्याचीही माहिती पोलिसांनी यापुर्वी केलेल्या तपासात उघड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com