

TET Paper Leak Mastermind Arrested
ESakal
भिवंडी : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीनंतर पोलिसांना महिनाभर गुंगारा देणाऱ्या मुख्य सूत्रधारास त्याच्या साथीदारासह भिवंडी पोलिसांनी पाटणा येथून अटक केली. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता आणि त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकू अशी त्यांची नावे आहेत. दोघांना सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती भिवंडी परिमंडळाचे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी दिली.