ठाकरे सरकारने संभाजी राजेंना दगा दिला; मराठा समन्वयकांचा आरोप

Thackeray govt betrayed Sambhaji Raje says Maratha Morcha coordinator
Thackeray govt betrayed Sambhaji Raje says Maratha Morcha coordinator

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) उमेदवारीवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे, संभाजी राजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर करत सर्व अपक्ष आमदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते, दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले असून संभाजी राजेंना (Sambhaji Raje) उमेदवारी नाकारण्यात आली आहे, यावर मराठा समन्वयकांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

शरद पवारांनी नांदेड येथील सभेत सांगीतलं होतं की, आम्ही उरलेली मंत संभाजी राजेंना देऊ असे सांगितलं होतं, शिवसेनेच्या नेत्यांना देखील हे माहित होतं. त्यानंतर चर्चा बरीच पुढं गेली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना संभाजी राजेंचा प्रस्ताव मान्य होता, जर मुख्यमंत्र्यांना हे मान्य होतं तर संजय राऊतांनी हे पाप घेतलं आहे, तेच पुढे महाविकास आघाडीचा नाश करतील असे या वेळी मराठा समन्वयक म्हणाले.

मतांची जुळवाजुळव झाली आहे, या निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे देखील समन्वयकांकडून या वेळी सांगण्यात आले. तुम्ही जी गद्दारी केली आहे, त्याबद्दल आगामी निवडणूकीत शिवसेनेचा खरा चेहरा पुढे आणणार असे देखील या वेळी सांगण्यात आले.

Thackeray govt betrayed Sambhaji Raje says Maratha Morcha coordinator
राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर संजय पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..

संभाजी राजेंना शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळावा असे अवाहन या वेळी करण्यात आले. तसेच प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी यांची संमती आहे. त्यासाठी कुठली अट नाही, पण छत्रपतींच्या वंशजांबाबत आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगून दगा-फटका उध्दव ठाकरे आणि शरद पवार सरकारने केला आहे, धोका शब्द बदलून शरद पवार केलं पाहिजे, असं ते म्हणाले. शिवसेनेने पाठिंबा दिलं नाही तर, इतर पक्षानी संभाजी राजेंना पाठिंबा द्यावा, असे अवाहन देखील या वेळी करण्यात आले.

Thackeray govt betrayed Sambhaji Raje says Maratha Morcha coordinator
'जर शरद पवार मला भेटले तर, आदरानं त्यांना प्रणाम करणार'

संभाजीराजे शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्यास कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर संजय राऊत यांनी संजय पवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com