Sushma Andhare: "गुलाब भाऊ, हमने तुमको दिल दिया दिलदार समझकर..." अंधारेंचे टोमणेबाजी

राज्यात ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरु
Sushma Andhare
Sushma Andhare Esakal
Updated on

राज्यात ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यानिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल एरंडोलला सभा घेतली. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी सभेत बोलताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर शेरोशायरीतून हल्ला चढवला आहे. गुलाब भाऊ, हमने तुमको दिलं दिया दिलदार समझकर, लेकीन तुमने ठुकरा दिया फूटबॉल सझकर, असा शेर म्हणत त्यांनी गुलाबरावांवर टीका केली.

सुषमा अंधारे यांनी सभेत बोलताना शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाचेच आमदार चिमणराव पाटील यांच्या वादावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याला आपल्याच मतदारसंघात निधी दिल्याने चिमणराव पाटील नाराज आहेत. हा वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. मात्र, तरीही दोघांमधील वाद काही थांबेना. या वादामद्धे आता सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी चिमणराव यांना केला आहे.

Sushma Andhare
Sushma Andhare: मुख्यमंत्र्यांच्या बुद्ध्यांकावर सुषमा अंधारे घसरल्या

सभेत बोलताना अंधारे यांनी शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदेंनी भाजपला 40 जणांची कुंडली पुरवली. पण आमदार चिमणराव पाटील यांना का पळपुटेपणा करावा लागला? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Sushma Andhare
Sushma Andhare: माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात, पण मी...सुषमा अंधारे संतापल्या

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, चिमणराव पाटील मला माझ्या आजोबासारखे आहेत. मात्र, गुवाहाटीत चिमणराव पाटील यांचं चिरतारुण्य दिसलं. चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग लावून का लावून घेतला?; असा थेट प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला आहे. चिमणराव पाटील तुम्हाला लोक काय म्हणतील कसं काय पाटील बरं आहे का? गुवाहाटीला गेले ते खरं आहे का?, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाबत मला काहीही तक्रार नाही. कारण सरकारमध्ये त्यांचं काहीच चालत नाही, असा टोला शिंदे यांना लगावला आहे.

Sushma Andhare
गुलाबराव, तुमच्या काळजाला पाझर का नाही फुटला? ; सुषमा अंधारे यांचा सवाल

पुढे त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा भारी आहेत. ते घटनास्थळी पोहाचण्याआधीच त्यांचा कॅमेरामन ठिकाणांवर पोहोचतो. मुख्यमंत्री निवडला की मॉडेल निवडले?, अशी टीकाह त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com