
Ladki Bahin Yojana
ESakal
वंशिका चाचे
ठाणे : राज्य सरकारच्या ''लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या अनुदानाचा उपयोग केवळ खर्चासाठी न करता, तो गुंतवणुकीसाठी आणि स्वयंउद्योजिका बनण्यासाठीही करता येतो, याचा आदर्श ठाण्यातील महिलांनी घालून दिला आहे. या योजनेतून मिळालेल्या निधीचा वापर करून ठाण्यातील सुमारे ५० महिलांनी बचत गट तयार करत दिवाळी फराळाचा व्यवसाय सुरू केला आहे. या उपक्रमामुळे त्यांना आर्थिक स्थैर्यासोबतच स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची नवी दिशा मिळाली आहे.