पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पातील लाभार्थींच्या नशिबी संघर्षच! १९ जानेवारी २०२४ रोजी १५०२४ घरकुलांचे लोकार्पण, ताबा मिळाला ३५३८ लाभार्थींनाच

देशातील सर्वात मोठा १८३८ कोटींचा ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सोलापुरातील कुंभारी हद्दीत होत आहे. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ हजार २४ घरकुलांचे लोकार्पण १९ जानेवारी २०२४ रोजी पार पडले. पण, पावणेदोन वर्षांत अवघ्या साडेतीन हजार लाभार्थींनाच घरकुलांचा ताबा मिळाला आहे.
ray nagar housing project

ray nagar housing project

solapur city

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : देशातील सर्वात मोठा १८३८ कोटींचा ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सोलापुरातील कुंभारी हद्दीत होत आहे. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ हजार २४ घरकुलांचे लोकार्पण १९ जानेवारी २०२४ रोजी पार पडले. पण, पावणेदोन वर्षांत अवघ्या साडेतीन हजार लाभार्थींनाच घरकुलांचा ताबा मिळाला आहे. लाभार्थींना बॅंकेचे दोन लाख १० हजार रुपयांचे कर्ज व रोखीने भरायचे ४० हजार रुपये आणि स्टॅम्प ड्यूटी, रजिस्ट्रेशनचे आठ हजार रुपये भरायला नाहीत. त्यामुळे घरकुले पूर्ण असतानाही ११ हजार ४८६ लाभार्थी त्यांच्या पडक्या घरातच राहत आहेत.

सोलापूर शहराजवळील कुंभारी हद्दीत ३६५ एकर परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेतून ३० हजार घरकुलांचा रे नगर प्रकल्प होत आहे. पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी एक स्वतंत्र पोलिस ठाणे, ४० अंगणवाड्या, उर्दू-मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सहा शाळा मंजूर झाल्या. पण, अजूनपर्यंत त्यातील एकही बाब पूर्ण झालेली नाही. लाभार्थींना त्याठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने सध्याचा कामधंदा सोडून नव्या ठिकाणी रहायला जाणे देखील अडचणीचे ठरू शकते म्हणून लाभार्थी त्याठिकाणी रहायला गेलेले नाहीत.

पहिल्या टप्प्यातील ११ हजार ४८६ लाभार्थींना आर्थिक अडचणींमुळे हक्काच्या घरांचा ताबा मिळालेला नाही. त्यातील सुमारे १४ हजार लाभार्थींना बॅंकांकडून कर्ज मिळाले, पण त्याचा हप्ता त्यांना देणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थींना रोखीने भरायचा ४० हजार रुपयांचा हिस्सा भरता आलेला नाही. त्यामुळे स्वप्नातील घर पूर्ण पूर्ण होऊनही त्यांना रहायला जाता आलेले नाही, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.

रे नगर गृहप्रकल्पांची सद्यःस्थिती

  • एकूण घरे

  • ३०,०००

  • पहिला टप्पा पूर्ण

  • १५,०२४

  • पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

  • १९ जानेवारी २०२४

  • बॅंककर्ज मंजूर झालेले लाभार्थी

  • १४,२००

  • सध्या घरांचा ताबा मिळालेले

  • ३,५३८

  • ------------------------------------------------------------

दुसऱ्या टप्प्यातील स्थिती

  • एकूण घरे

  • १४,९७६

  • बांधकाम परवाना मिळालेली घरे

  • १०,१८६

  • स्लॅब झालेली घरे

  • ८,७६४

  • परवान्याच्या प्रतीक्षेतील घरे

  • ४,७९०

  • दुसऱ्या टप्प्याची मुदत

  • ३१ डिसेंबर २०२५

४७९० घरकुलांचे काम अडकणार

देशातील सर्वात मोठ्या कुंभारीतील रे नगर गृहप्रकल्पाचा दुसरा टप्पा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार असून तशी मुदत निश्चित झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ हजार ९७६ घरकुलांचे काम अपेक्षित होते. पण, त्यातील १० हजार १८६ घरकुलांना बांधकाम परवाना मिळालेला आहे. दुसऱ्या टप्प्याची मुदत आता दोन महिन्यापर्यंतच राहिली आहे. तरीपण, चार हजार ७९० घरकुलांना अजूनही बांधकाम परवाना न मिळाल्याने त्याची कामे सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे ही घरे लटकली जातील, अशी सद्यःस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com