पदभरतीबाबत सरकारचा मोठा निर्णय; MKCL, TCS, IBPS मार्फत होणार परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recruitment will not take place even after the staff selection test
पदभरतीबाबत शासनाचा मोठा निर्णय; MKCL, TCS, IBPS मार्फत होणार परीक्षा

पदभरतीबाबत शासनाचा मोठा निर्णय; MKCL, TCS, IBPS मार्फत होणार परीक्षा

अलीकडच्या काळात झालेल्या विविध पदभरती (Recruitment) परीक्षांमधील गोंधळ आणि घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इथून पुढच्या परीक्षा MKCL, TCS IBPS मार्फत घेतल्या जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अलीकडच्या काळात आरोग्यसेवा, शिक्षक तसेच इतर परीक्षांच्या नियोजनात प्रचंड प्रमाणात गोंधळ झाला होता. यानंतर या परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचंही समोर आलं होते. त्यानंतर राज्यभरातून सरकारवर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर शासनाचा मोठा निर्णय घेतला आहे. (The Maharashtra government has decided that the recruitment test will be conducted through MKCL, TCS IBPS)

हेही वाचा: पदभरती होत असल्याच्या नावाखाली केली जातेय फसवणूक ; सावध राहण्याचा ‘एआयसीटीई’चा इशारा

इथून पुढच्या परीक्षा या MKCL, TCS IBPS यांच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहे. दरम्यान शासनाचा या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जातंय.

Web Title: The Government Has Decided That The Recruitment Test Will Be Conducted Through Mkcl Tcs Ibps

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top