आईला विषारी सापाचं पिल्लू चावलं; तरीही मुलाने बाकीची ११ पिल्लं वाचवली

घोणस सापाचे पिल्लू असल्याचे समजताच सगळ्यांच्या भुवया आपोआप उंचावल्या, कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला घोणस सापाची मादी ८ ते ६४ इतकी पिल्लं देते.
Russell's viper
Russell's vipersakal

मुंबई : पाटण येथील छाया बबन निकम यांना १६ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास त्या झोपेत असताना घोणस सापाच्या नुकतेच जन्मलेल्या पिल्लाने दंश केला. त्यामुळे त्यांना तात्काळ सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. ही बातमी जेव्हा त्यांचा मुलगा सर्पमित्र अक्षय निकम यांना समजली तेव्हा ते पुण्यामध्ये होते. त्यामुळे त्यांनी तात्काळ कोयनानगर येथील वन्यजीव अभ्यासक व रक्षक विकास माने यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली.

विकास माने यांनी सातारा येथील वन्यजीवरक्षक सुमित वाघ यांना रुग्णालयात जाऊन परिस्थिती पाहण्यास सांगितले. सुमित वाघ हेही वेळ न घालवता रुग्णालयात पोहोचले. घोणस सापाचे पिल्लू असल्याचे समजताच सगळ्यांच्या भुवया आपोआप उंचावल्या, कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला घोणस सापाची मादी ८ ते ६४ इतकी पिल्लं देते. यामुळे आणखी पिल्लं असल्याचा संशय बळावत होता.

Russell's viper
एकेकाळच्या दहावी नापासांनी घडवला इतिहास; एक पद्मश्री तर दुसरा सिनेविश्वाचा अभिमान

अक्षय यांनी घरी जाऊन आणखी पिल्लं आहेत का याचा शोध घ्यायचं ठरवलं व त्यांनी आंम्रग येथील घरी जाऊन घरामध्ये आणि आसपासच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना ११ पिल्लं मिळाली.

कोणत्याही सापाचा आपल्याला मुद्दाम त्रास देण्याचा अजिबात हेतू नसतो. ज्याप्रमाणे आपण सापाला घाबरून त्याला मारतो त्याच पद्धतीने साप ही आपल्याला घाबरून दंश करतात. कारण प्रत्येक सजीवाला जीव असतो आणि जगण्याचा अधिकारही. त्यामुळे वन्यजीवरक्षक अक्षय निकम यांनी त्या पिल्लांना सुखरूप निसर्गात मुक्त करून आपलं कर्तव्य पार पाडले.

यावेळी मल्हारपेठ येथील वन्यजीवरक्षक विनायक कदम, मोरगिरी येथील वन्यजीवरक्षक अक्षय हिरवे, कोयनानगर येथील वन्यजीवरक्षक दत्ता कांबळे व विकास माने यांनी अक्षय निकम यांच्या घरी भेट देऊन परिसरात पाहणी केली.

जगण्यासाठी अन्न हे प्रत्येकाला गरजेचं असते व त्याच्याच शोधात साप हे मनुष्यवस्तीत अथवा आपल्या घरामध्ये येतात. पण अशावेळी आपला हात किंवा पाय याच्याजवळ गेला तर ते घाबरून आपल्याला दंश करतात. आपण सापांहून कितीतरी पटीने बुद्धिमान आहोत व आपल्याला प्रत्येक गोष्टीची समज ही आहे. त्यामुळे आपणच योग्य ती काळजी घ्यावी व साप अथवा जखमी वन्यजीव आढळल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता तात्काळ जवळच्या वन्यजीवरक्षकांशी अथवा वनविभागाच्या १९२६ या मदत क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन यावेळी वन्यजीव अभ्यासक व रक्षक विकास माने यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com