रक्तातील नातेच उठले जिवावर! सोलापूर जिल्ह्यात सव्वादोन वर्षांत सोलापूर शहरात 25 तर ग्रामीणमध्ये 139 खून; मालमत्ता, चारित्र्यावर संशय व अनैतिक संबंधातून सर्वाधिक गुन्हे

सोलापूर जिल्ह्यात सव्वादोन वर्षांत खुनाचे १३९ गुन्हे घडले आहेत. यात प्रॉपर्टीचा वाद व चारित्र्याचा संशय हीच प्रमुख कारणे अनेक गुन्ह्यांच्या तपासातून समोर आले आहे. मुलाने आई-वडिलांचा, भावाने भावाचा, पत्नीने पतीचा किंवा पतीने पत्नीचा, नातवाने आजीचा खून केल्याचेही गुन्हे लक्षणीय आहेत.
sakal exclusive
sakal exclusivesakal

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात मागील सव्वादोन वर्षांत खुनाचे १३९ गुन्हे घडले आहेत. यात प्रॉपर्टीचा वाद व चारित्र्याचा संशय हीच प्रमुख दोन कारणे अनेक गुन्ह्यांच्या तपासातून समोर आले आहे. मुलाने आई-वडिलांचा, भावाने भावाचा, पत्नीने पतीचा किंवा पतीने पत्नीचा, नातवाने आजीचा खून केल्याचेही गुन्हे लक्षणीय आहेत.

मूलं जन्मल्यानंतर ते आपल्या म्हातारपणी आधाराची काठी बनेल, शिकून मोठा होऊन आपला नावलौकिक गाजवले या हेतूने आई-वडील त्या मुलांचे पालनपोषण करतात. स्वत: उपाशीपोटी झोपतात, पण मुलांना पोटभर खायला घालतात. त्याच्या शिक्षणासाठी काही कमी पडू देत नाहीत. तोच मुलगा मोठा झाल्यावर जन्मदात्या आई-वडिलांसाठी कर्दनकाळ ठरतो हे दुर्दैवी. दुसरीकडे बालपणापासून एकमेकांसोबत वावरणारे, एकाला काटा मोडला तर दुसऱ्याला वेदना होणारा भाऊ, भावाच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून स्वत: शिक्षण सोडून कामावर जाऊन भावाच्या शिक्षणाचा खर्च भागवतो.

ज्याच्या भरवशावर स्वत:ला सुरक्षित मानणारा तोच भाऊ पुढे जाऊन प्रॉपर्टी किंवा इतर किरकोळ कारणातून सख्ख्या भावाला संपवितो अशीही काही उदाहरणे आहेत. तसेच ज्याच्यासोबत सातजन्माची स्वप्ने पाहिली तोच पती संशयातून किंवा स्वत:चे अनैतिक संबंध लपविण्यासाठी अर्धांगिणीचा खून करतो. तर काहीवेळा पत्नी स्वत:चे अनैतिक संबंध जपण्यासाठी पतीचा खून करते, असेही गुन्हे घडले आहेत. एकूणच संपत्ती, अनैतिक संबंध व संशयातून आपल्या सख्ख्या रक्ताच्या नात्यांचा देखील लोकांना विसर पडतोय, अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

ग्रामीणमधील खुनाचे गुन्हे

  • सन खुनाचे गुन्हे

  • २०२२ ५७

  • २०२३ ६४

  • २०२४ (मार्च पर्यंत) १८

  • एकूण १३९

शहरातील खुनाचे गुन्हे

  • सन खुनाचे गुन्हे

  • २०२२ १२

  • २०२३ ०९

  • २०२४( मार्च पर्यंत) ०४

  • एकूण २५

जिल्ह्यात सहा दिवसाला खुनाचा एक गुन्हा

जानेवारी २०२२ ते मार्च २०२४ या सव्वादोन वर्षांत सोलापूर शहर-जिल्ह्यात १३९ जणांचे खून झाले आहेत. प्रत्येक सहा दिवसाला एक खून होतो, असे सरासरी प्रमाण आहे. सोलापूर शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत खुनाचे प्रमाण कमी आहे. पण, अनैतिक संबंध, मालमत्ता व चारित्र्याचा संशय या प्रमुख तीन कारणातूनच बहुतेक खून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत्यूसमयी स्वत:सोबत काहीही नेता येत नाही, तरीसुद्धा रक्तातील लोक विश्वासाने आपल्याच कुटुंबातील व्यक्तीच्या जिवावर उठत असल्याची स्थिती आहे.

कायदा हातात न घेता प्रत्येकाला कायदेशीर न्याय मिळतोच

संपत्तीत हिस्सा, अनैतिक संबंध, चारित्र्याचा संशय या कारणातूनच बहुतेक खून झाले आहेत. पण, कायदा हातात न घेता प्रत्येकाला कायदेशीर न्याय मिळतोच. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलून स्वत:सह कुटुंबातील इतर सदस्यांचे आयुष्य बरबाद होणार नाही, याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com