विधानपरिषदेत निवडून आलेल्या सहा आमदारांचा उद्या होणार शपथविधी

legislative Council
legislative Council

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल (Maharashtra Vidhan Parishad Election Result) 14 डिसेंबर जाहीर झाला. सहापैकी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. निवडणूक बिनविरोध पार न पडलेल्या नागपूर (Nagpur) आणि अकोला-वाशिम-बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 14 डिसेंबर रोजी पार पडली होती.

legislative Council
"मोदींचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेची माफी मागावी"

यात अपेक्षेप्रमाणे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar Bawankule), तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) विजयी ठरले. यामुळं या विधान परिषद निवडणुकीत सहापैकी चार जागांवर भाजपनं विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. नुकत्याच झालेल्या या विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा उद्या दुपारी एक वाजता विधिमंडळात शपथ विधी होणार आहे.

निवडून आलेले सहा आमदार कोण?

  1. चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

  2. वसंत खंडेलवाल, भाजप

  3. राजहंस सिंग, भाजप

  4. अमरिश पटेल, भाजप

  5. सतेज पाटील, काँग्रेस

  6. सुनील शिंदे, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com