मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नाही - सुप्रिया सुळे

विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे; त्यांनी बोलत राहावे - सुळे
Supriya Sule
Supriya Suleटीम ईसकाळ
Updated on

सध्या महाराष्ट्रात विरोधक मुख्यमंत्री बदलण्याची मागणी करीत आहे. मुख्यमंत्री मागील अनेक दिवसांपासून आजारी असल्याने सक्रिय नाही. त्यामुळे कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कुणाला तरी ही जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्या पुण्यातील वारजे येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या.

कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केले. त्यांच्या या कामाचे कौतुक परदेशात करण्यात आले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांनी बोलत राहावे. त्यामुळे त्यांच्या या मागणीला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Merit Over Influence: Three Siblings from Kelghar Earn Prestigious Government Jobs
Women beneficiaries checking their names after e-KYC verification update in Ladki Bahin Yojana, Maharashtra.
Railway Revises Konkan Route Operations for Monsoon; Several Train Schedules Altered
Heatwave Eases as Pre-Monsoon Activity Intensifies Across Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com