अनिल परब यांना ईडीची तिसऱ्यांदा नोटीस; मंगळवारी चौकशीसाठी बोलावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil parabThird ED notice to Anil Parab

अनिल परब यांना ईडीची तिसऱ्यांदा नोटीस; मंगळवारी चौकशीसाठी बोलावले

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना तिसऱ्यांचा ईडीने नोटीस बजावली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांना नोटीस (notice) बजावण्यात आली होती. सोमवारी (ता. २०) विधान परिषदेच्या निकालानंतर मतमोजणी सुरू असताना अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी मंगळवारी (ता. २१) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (Third ED notice to Anil Parab)

मागच्यावेळी अनिल परब (Anil Parab) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस बजावली होती. यानंतर ते शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. ईडीची नोटीस मला कालच मिळाली. मी मुंबईत नसल्यामुळे ईडी कार्यालयात जाऊ शकलो नाही. तसे ईडी कार्यालयाला कळविले आहे. मुंबईत गेल्यावर ईडी कार्यालयात जाईल. ते जे प्रश्न विचारतील त्याला उत्तरे देण्यासाठी मी बांधील आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

हेही वाचा: काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; सहाय म्हणाले, मोदी हिटलरप्रमाणे मरतील

शिर्डीला जाणे पूर्वनियोजित होते, असेही अनिल परब म्हणाले होते. सोमवारी (ता. २०) त्यांना तिसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच त्यांना नोटीस (notice) पाठवण्यात आली आहे. चौकशीत त्यांना मंगळवारी हजर राहण्यास सांगितले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल परब यांना ईडीने (ED) तिसरी नोटीस पाठवली आहे.

Web Title: Third Ed Notice To Anil Parab

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EDAanil parab
go to top